मोठी बातमी! 19 जिल्ह्यांत 19 मंत्र्यांना झेंडावंदनाचे अधिकार बहाल

मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव भूषण गगराणी यांनी कोणत्या जिल्ह्यात कोण ध्वजारोहण करणार आहे याची यादीच प्रसिद्ध केली आहे.

eknath shinde devendra fadanvis
eknath shinde devendra fadanvis

मुंबईः राज्यात शिंदे-फडणवीस यांचं सरकार स्थापन झालं असून, आतापर्यंत भाजप आणि शिंदे गटाच्या 18 आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आलीय. स्वातंत्र्य दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्ह्यांत ध्वजारोहण करण्याची प्रथा आहे. आता मंत्रिमंडळ विस्तार झाला असला तरी खातेवाटप आणि पालकमंत्री अद्यापही निश्चित झालेले नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव भूषण गगराणी यांनी कोणत्या जिल्ह्यात कोण ध्वजारोहण करणार आहे याची यादीच प्रसिद्ध केली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर जिल्ह्यात जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी होणाऱ्या शासकीय ध्वजारोहणात झेंडावदन करणार असून, सुधीर मुनगंटीवार हे चंद्रपूरमध्येही झेंडावंदन करणार आहेत. चंद्रकांत पाटील पुणे, राधाकृष्ण विखे-पाटील अहमदनगर, गिरीश महाजन नाशिक, दादाजी भुसे धुळे, गुलाबराव पाटील जळगाव, रवींद्र चव्हाण ठाणे, मंगलप्रभात लोढा मुंबई उपनगर, दीपक केसरकर सिंधुदुर्ग, उदय सामंत रत्नागिरी, अतुल सावे परभणी, संदीपान भुमरे औरंगाबाद, सुरेश खाडे सांगली, विजयकुमार गावित नंदुरबार, तानाजी सावंत उस्मानाबाद, शंभूराज देसाई सातारा, अब्दुल सत्तार जालना, संजय राठोड यवतमाळ अशा पद्धतीनं संबंधित मंत्र्यांना त्यांच्या जिल्ह्यांतील झेंडावंदनाचे अधिकार देण्यात आलेत. तर इतर जिल्ह्यांतील झेंडावंदनाचे अधिकार हे संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

शिंदे मंत्रिमंडळात खातेवाटपाचा पेच अजून कायम आहे. खातेवाटप होत नसल्याने जिल्ह्याचे पालकमंत्री अजून नियुक्त झालेले नाहीत. अशातच  स्वातंत्र्यदिन जवळ येऊन ठेपला असताना ध्वजारोहण कुणाच्या हस्ते होईल, याविषयी उत्सुकता होती. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी कोणत्या जिल्ह्यात कोणता मंत्री ध्वजारोहण करेल, याची यादी तयार केली आहे. त्यानुसार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरमध्ये, सुधीर मुनगंटीवार चंद्रपूरमध्ये तर चंद्रकांत पाटील पुण्यात झेंडावंदन करतील.

दरम्यान, ध्वजारोहणासाठी नियुक्त झालेले मंत्री पुढीलप्रमाणे- दीपक केसरकर (सिंधुदुर्ग), उदय सामंत (रत्नागिरी), अतुल सावे (परभणी), संदिपान भुमरे (औरंगाबाद ), सुरेश खाडे (सांगली), डॉ. विजयकुमार गावित (नंदूरबार), तानाजी सावंत (उस्मानाबाद), शंभूराज देसाई (सातारा), अब्दुल सत्तार (जालना ), संजय राठोड (यवतमाळ). अमरावती जिल्ह्यात विभागीय आयुक्त तर कोल्हापूर, रायगड, बीड, हिंगोली, वर्धा, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, अकोला, सोलापूर, लातूर, वाशीम, बुलढाणा, पालघर आणि नांदेड  येथे संबंधित जिल्हाधिकारी ध्वजारोहण करतील.


हेही वाचाः मोदींनी व्यंकय्या नायडूंची केली विनोबा भावेंशी तुलना, म्हणाले…