घरताज्या घडामोडीमुंबईत चार फ्लॅट, महागडी घड्याळं... एवढी संपत्ती असलेल्या समीर वानखेडेंच्या आर्यन प्रकरणात नवा ट्विस्ट

मुंबईत चार फ्लॅट, महागडी घड्याळं… एवढी संपत्ती असलेल्या समीर वानखेडेंच्या आर्यन प्रकरणात नवा ट्विस्ट

Subscribe

कॉर्डेलिया क्रुझ ड्रग प्रकरणात किंग खान शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक करणारे एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांच्या केसमधून नवनवीन ट्वीस्ट समोर येत आहेत. वानखेडे यांनी 2 ऑक्टोबर 2021 मध्ये आर्यन खानला ड्रग्स प्रकरणात अडकण्यापासून वाचवण्यासाठी अभिनेता शाहरूख खानकडून 25 कोटींची खंडणी मागितली होती. शेवटी ही डील 18 कोटींना नक्की करण्यात आल्याचा दावा सीबीआयने केला आहे.

समीर वानखेडे यांनी आपल्या संपूर्ण कुटुंबासह अनेक विदेशी दौरे केले होते. एवढंच नाही तर वानखेडे यांच्याकडे बेहिशोबी मालमत्ता असल्याचा खुलासा एनसीबीने आपल्या अहवालातून केला आहे. तसेच आर्यन खान प्रकरणात लाच मागितल्याप्रकरणी सीबीआयने वानखेडेंविरोधात FIR दाखल केला आहे.

- Advertisement -

आर्यन खानचं नाव शेवटच्या वेळी आरोपींच्या यादीत टाकलं, असा मोठा दावा चौकशी अधिकाऱ्याने केला आहे. कॉर्डेलिया क्रुझ ड्रग प्रकरणात तपासातील त्रुटींची आणि आरोपांची चौकशी आयपीएस अधिकारी ज्ञानेश्वर सिंह करत होते. यावेळी अनेक गोष्टी समोर आल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणाच्या मूळ केस नोटमध्ये बदल करून आर्यन आणि अरबाझ या दोघांची नावे वाढवणात आली आहेत, तर काहींची नावे वगळण्यात आली असल्याचा दावा आयपीएस अधिकारी ज्ञानेश्वर सिंह यांनी प्रतिज्ञापत्रात केला आहे.

- Advertisement -

5 वर्षात केला 6 देशांचा प्रवास

2017 ते 2021 या पाच वर्षांत समीर वानखेडे यांनी आपल्या कुटुंबासोबत सहा विदेशी दौरे केल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. या देशांमध्ये ब्रिटन, आयर्लंड, पोर्तुगाल, दक्षिण आफ्रिका आणि मालदीव यांचा समावेश आहे, जिथे ते 55 दिवस राहिले. या दौऱ्यात त्यांनी फक्त 8.75 लाख रुपये खर्च केले आहेत. खरं म्हणजे एवढे रुपये फ्लाइटच्या तिकीटांमध्ये खर्च होतात.

या अहवालात समीर वानखेडे यांची महागडी घड्याळं आणि इतर मालमत्तांचाही समावेश आहे. 2018 मध्ये 17.40 लाख रुपयांचं एक रोलेक्सचं घड्याळ खरेदी केलं होतं. यावेळी वानखेडेंनी दावा केला आहे की, त्यांना हे घड्याळ पत्नी क्रांतीने गिफ्ट केलं होतं. परंतु वानखेडेंनी काही कारणास्तव त्यांच्याकडील चार महागडी घड्याळं कमी किमतीत विकली होती. कर्टियर या घडाळ्याची मूळ किंमत 10.60 लाख असून 6.40 लाखात विकण्यात आलं होतं.

वानखेडे यांच्या मुंबईत 5 प्रॉपर्टी असून यातील काही त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावरही आहे. यामध्ये त्यांच्या नावाचा एक बारही आहे. तसेच वाशिममध्ये 41 हजार 688 एकर जमीन आहे.

मुंबईतील गोरेगाव फ्लॅटसाठी 82.8 लाखांचा खर्च केल्याचा दावा समीर वानखेडे यांनी केलाय. तर लग्नापूर्वी त्यांनी आणि त्यांच्या पत्नीनेही फ्लॅट खरेदी केला होता. वानखेडे आणि त्यांच्या पत्नीच्या आयकर रिटर्नमध्ये त्यांचे वार्षिक उत्पन्न 45 लाख 61 हजार 460 रुपये असल्याचे दिसून आले आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोचे झोनल डायरेक्टर म्हणून त्यांचा महिन्याचा पगार 1 ते दीड लाखांच्या जवळपास आहे. मग या पगारात वानखेडेंची इतकी संपत्ती आणि आंतरराष्ट्रीय दौरे करणं कसं शक्य झालं, यावर चर्चा केली जात आहे.


हेही वाचा : मविआत जागा वाटपावरून खलबतं, शिवसेनेला कोणत्या जागा? अशोक चव्हाणांनी दिले


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -