घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रआधुनिक यंत्रणेद्वारे नाशकवर राहणार ‘वॉच’; ३७ प्रकारच्या ९३३ सार्वजनिक ठिकाणांचे मॅपिंग

आधुनिक यंत्रणेद्वारे नाशकवर राहणार ‘वॉच’; ३७ प्रकारच्या ९३३ सार्वजनिक ठिकाणांचे मॅपिंग

Subscribe

नाशिक शहर पोलिसांची ‘सुरक्षित नाशिक’ प्रणाली कार्यान्वित

नाशिक शहर पोलीस प्रशासनाकडून गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ग्राउंड प्रेझेन्स मॉनिटरिंग सिस्टम अर्थात ‘सुरक्षित नाशिक’ ही आधुनिक कार्यप्रणाली कार्यान्वित करण्यात आली. मंगळवारपासून (दि. ९) शहरातील १३ पोली ठाण्यांच्या हद्दीत गस्त करणार्‍या बीट मार्शलपासून ते वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनासुद्धा या कार्यप्रणालीचा वापर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. ३७ प्रकारच्या ९३३ ठिकाणांचे मॅपिंग या प्रणालीद्वारे केले जाणार आहे.

नाशिक शहर व परिसरात पोलीस गस्तीला आधुनिक जीपीएस तंत्रज्ञान प्रणालीची जोड देत स्वतंत्र मोबाइल अ‍ॅप्लिकेशन विकसित करण्यात आले आहे. पूर्वी गस्तीदरम्यान महत्त्वाच्या ठिकाणांवर लावण्यात आलेले पोलीस क्यू-आर कोड स्कॅनिंग करण्यात येत होते. मात्र, आता गस्तीवर असलेल्या पोलिसांना या अ‍ॅपचा वापर करत यामध्ये समाविष्ट असलेल्या ठिकाणांना भेट द्यावी लागणार आहे.

- Advertisement -

मॅपिंग केलेल्या ठिकाणांचा रंग आपोआप बदलला जाणार

सुमारे १ हजार १३१ पोलीस अंमलदारांकडून या अ‍ॅप्लिकेशनचा वापर केला जाणार आहे. भेट दिल्यानंतर त्या मॅपिंग केलेल्या ठिकाणांचा रंग आपोआप बदलला जाणार असून, त्याची नोंद घेतली जाणार आहे. या प्रणालीमध्ये अक्षांश-रेखांश याचा समावेश आहे. जेव्हा पोलीस अंमलदार त्या ठिकाणाला भेट देईल आणि फोटो काढून अपलोड करेल, तेव्हा आजूबाजूचा परिसरसुद्धा त्यामध्ये दिसेल, यामुळे पोलीस अंमलदाराला गस्तीदरम्यान भेटीच्या ठिकाणांवर प्रत्यक्षपणे जावेच लागणार आहे, यामुळे ही प्रणाली अधिक प्रभावी ठरेल, असा विश्वास पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी व्यक्त केला आहे.

पोलीस ठाणेनिहाय हे स्पॉट समाविष्ट

सर्वसाधारण स्थळांतर्गत ३७ ठिकाणे, प्राधान्यक्रमाची स्थळे, निवडणूक संबंधीची ठिकाणे, नागरिकांनी सुचविलेले ब्लॅक स्पॉट अशा कॅटेगरीमध्ये एकुण ९३३ उपठिकाणांचे मॅपिंग होणार आहे. यामध्ये उद्याने, मोकळे भूखंड, जॉगिंग ट्रॅक, भाजीमार्केट, बसस्थानके, रेल्वे स्थानक, सराफबाजार, बँका, महिलांचा वावर असलेली ठिकाणे, शाळा, कॉलेज, धार्मिक स्थळेे, शासकीय कार्यालये या पमध्ये समाविष्ट आहेत. हे अ‍ॅप व्हिजेबल पेट्रोलिंग व नाशिककरांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाचे ठरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -