घरमहाराष्ट्रNana Patekar : ना.. ना.. करत पाटेकर मराठा आरक्षणावर बोललेच; म्हणाले...

Nana Patekar : ना.. ना.. करत पाटेकर मराठा आरक्षणावर बोललेच; म्हणाले…

Subscribe

मुंबई : मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या शांत असला तरी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आंदोलनाच्या मुद्द्यावर ठाम आहेत. मोठ्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईत दाखल होणार आहेत. याबाबतची तारीख अद्यापही जरांगे यांनी जाहीर केलेली नाही. परंतु, येत्या काही दिवसांत हा मुद्दा पुन्हा एकदा पेटणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मराठा आरक्षणाबाबत अनेकांनी आपले मत व्यक्त केले आहे. राजकारणापासून दहा हात लांब असलेले अभिनेते नाना पाटेकर हे कायमच सामाजिक विषयांवर आपले मत व्यक्त करत असतात. मात्र, अद्यापही त्यांनी मराठा आरक्षणाबाबत कोणतेही मत व्यक्त केले नव्हते. परंतु, आता पहिल्यांदाच त्यांनी आरक्षणाबाबत प्रतिक्रिया दिली आहे. (Actor Nana Patekar reacts on Maratha reservation for the first time)

हेही वाचा… “लोकशाहीचा विजय, घराणेशाहीचा पराभव”, CM Eknath Shinde यांची उद्धव ठाकरेंवर टीका

- Advertisement -

मराठा आरक्षणाविषयी तुमचे मत काय? असा प्रश्न नाना पाटेकर यांना प्रसार माध्यमांकडून विचारण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी म्हटले की, मला माहीत नाही. आरक्षणासंदर्भात मी टिप्पणी करू नये. आरक्षणाबाबत माझी मतं फार पराकोटीची आहेत. मी काही बोललो तर पुन्हा उद्या त्यावरून बोंबाबोंब होईल. त्यामुळे त्यांनी आताही फारसे काही न बोलता यांवर थेट उत्तर देणे, किंवा आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करणे टाळले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी नानांनी पंतप्रधान मोदी यांचे नेतृत्व उत्तम असल्याचे म्हटले होते. त्यामुळे हा प्रश्नही त्यांना विचारला असता त्यांनी सांगितले की, राजकारण हा माझा प्रांत नाही. मी तिथे जराही टिकू शकणार नाही. माधुरी दीक्षितचे मला माहीत नाही पण त्या क्षेत्रात मी टिकू शकणार नाही. तुम्ही बाहेर असल्याने तुमची मतं मांडता येतात. तिथे गेल्यानंतर तुमच्या मताला कितपत किंमत असेल मला माहीत नाही.

नाना पाटेकर यांनी भाजपाविषयी आपले स्पष्ट मत मांडत म्हटले की, आपण राजकारणाविषयी याठिकाणी बोलू नये, ते एवढ्यासाठी की मग मी फार परखडपणे बोलेन. त्यावरून पुन्हा कॉन्ट्रोव्हर्सी होईल. मी कुठल्याही पक्षाचा नाही. माझे वडील कट्टर काँग्रेसवादी होते, मी कट्टर शिवसेनेचा होतो. आज मला भाजपा खूप छान काहीतरी करेल अशी खात्री वाटते. मला नरेंद्र मोदी, अमित शाह किंवा आमचे देवेंद्र फडणवीस ज्या पद्धतीने काम करतात, ते मला आवडते. ज्या पद्धतीने नितीन गडकरी काम करतात, ते मला आवडते. कोण काय बोलेल याच्याशी काही घेणेदेणे नसते. आपल्याला आपले काम अतिशय इमानाने करता आले पाहिजे. गडकरी या गोष्टीचे मोठे उदाहरण आहेत. तो माणूस अजातशत्रू आहे. विरोधी पक्षातील मंडळी, त्यांच्या पक्षातली मंडळी.. सगळ्यांनाच ते हवेहवेसे वाटतात. जो कोणी छान काम करतो, त्याला नमस्कार करायचा. फक्त त्याच्याकडे स्वत:साठी वैयक्तिकरित्या काही मागायचे नाही. मग तुमची मैत्री टिकून राहते, असे स्पष्टपणे नाना पाटेकर यांनी सांगितले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -