या खोके सरकारचं लक्ष त्यांच्या गटात कोण येतंय याकडे..,आदित्य ठाकरेंची टीका

aditya thackeray

वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प राज्यातून गुजरातला गेल्यावरून राजकारण पेटल्याचं दिसून येत आहे. हा प्रकल्प राज्याबाहेर गेल्याचा निषेध करण्यासाठी आदित्य ठाकरेंच्या नेतृत्नात तळेगावमध्ये जनआक्रोश आंदोलन करण्यात आलं. यावेळी आदित्य ठाकरेंनी सरकारवर टीका केली आहे.

महाराष्ट्रात येऊ शकणारा प्रकल्प दुसऱ्या राज्यात गेला. वेदांता-फॉक्सकॉन, बल ट्रक पार्क आणि मेडिसिन डिव्हाईस पास्क हा प्रकल्पही आता महाराष्ट्रातून निघून गेला आहे. या खोके सरकारचं लक्ष त्यांच्या गटात कोण येतंय याकडे आहे. पण राज्यात उद्योग कोणते येत आहेत आणि गुंतवणूक कोण घेऊन येतंय याकडे कुणाचंच लक्ष नाहीये, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी शिंदे गटावर टीका केली.

वेदांता-फॉक्सकॉनला आपल्या सरकारने १० हजार कोटींची सबसिडी देण्याचं नियोजन केलं होतं. १२०० एकर जागा देणार होतो. मात्र तरी वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प जिथे पाणी नाही, वीज नाही तिथे गेलाच कसा असा प्रश्न उपस्थित होतो, असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलंय.

गुजरातच्या उद्योगमंत्र्यांनी चांगलं काम केलं. मी गुजरात किंवा केंद्र सरकारला दोष देणार नाही. पण दोष खोके सरकारचा आहे. तळेगावमध्ये काहीही कमतरता नाही. सर्वकाही असून प्रकल्प तिकडे गेला. मुख्यमंत्री स्वत:साठी वारंवार दिल्लीला गेले आहेत. पण महाराष्ट्रासाठी कधीच गेलेले नाहीत, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र सोडलं आहे.


हेेही वाचा : भाजपच्या मुंबई जिल्हा उपाध्यक्षांचा शिवसेनेत प्रवेश, ठाकरेंच्या उपस्थितीत बांधलं शिवबंधन