घरताज्या घडामोडीराजकीय द्वेषातून नावे ठेवणाऱ्यांनी...; आदित्य ठाकरेंनी विरोधकांना सुनावले

राजकीय द्वेषातून नावे ठेवणाऱ्यांनी…; आदित्य ठाकरेंनी विरोधकांना सुनावले

Subscribe

मुंबई : शिवसेनेमध्ये फूट पडल्यापासून माजी मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे शिंदे गटावर चौफेर टीका करत आहेत. त्यामुळे अलीकडच्या काळात शिंदे गटाने देखील आदित्य ठाकरे यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. राणीच्या बागेच्या महसुलाचा संदर्भ देत आदित्य ठाकरे यांनी सुनावले आहे.

भायखळ्याच्या राणी बागेत नववर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे 1 जानेवारी 2023 रोजी तब्बल 32 हजार 820 हजार पर्यटकांनी विक्रमी भेट दिल्याची नोंद झाली आहे. त्यामुळे पालिकेच्या तिजोरीत तब्बल 13 लाख 78 हजार 725 रुपयांची कमाई झाली. यापूर्वी, 6 नोव्हेंबर 2022 रोजी 32 हजार पर्यटकांनी भेट दिल्याची विक्रमी नोंद झाली होती. त्यामुळे पालिकेच्या तिजोरीत 11 लाख 12 हजार 925 रुपयांची कमाई झाली होती.

- Advertisement -

काल, रविवारी वर्षांचा पहिला दिवस आणि रविवार असल्याने सकाळपासूनच राणीच्या बागेत पर्यटकांची गर्दी लोटली होती. राणीच्या बागेची जागा, व्यवस्थापन, तिकीट कक्षाची क्षमता आदींचा विचार करता सर्वांना संधी देणे शक्य नव्हते. त्यामुळे राणी बाग प्रशासनाने अखेर सायंकाळी 4.45 वाजता मुख्य प्रवेशद्वार बंद करून व गर्दीला आवर घातला. यामुळे हिरमोड झालेल्या शेकडो पर्यटकांना नाईलाजाने माघारी जावे लागले, अशी माहिती प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी दिली होती.

राणीच्या बागेत 26 जुलै 2016 रोजी, दक्षिण कोरियाच्या सेऊल येथील कोएक्स एक्वॅरियममधूनतीन नर आणि पाच मादी पेंग्विन आणण्यात आले आहेत. ते या राणी बागेचे आकर्षण ठरले आहे.

- Advertisement -

राजकीय द्वेषातून नावे ठेवणाऱ्यांनी ही बातमी जरुर वाचावी. वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानातील मुंबई प्राणिसंग्रहालयात उद्धव ठाकरे आणि मी जे काही साध्य करण्याचा प्रयत्न केला त्याचा अभिमान आहे.

नववर्षानिमित्त राणी बागेत पर्यटकांची गर्दी, पालिकेला १४ लाखांची कमाई


हेही वाचा : भाजपाचे पुन्हा पंकजा मुंडेंकडे दुर्लक्ष? जे. पी. नड्डांच्या कार्यक्रमाचे निमंत्रणच नाही!


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -