विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती झाल्यानंतर अजित पवारांनी घेतली राज्यपालांची भेट

विरोधी पक्षनेते पदी नियुक्ती झाल्यानंतर अजित पवार यांनी आज मुंबईत राजभवन येथे जाऊन राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली.

महाविकास आघाडीचे सरकार (Mahavikas Aghadi Government) पालटून आता शिवसेनेतील शिंदे गट आणि भाजपचे सरकार सत्तेवर आले आहे. दोन दिवसाच्या विशेष अधिवेशनात सोमवारी विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Opposition leader Ajit Pawar) यांची नियुक्ती करण्यात आली. विरोधी पक्षनेते पदी नियुक्ती झाल्यानंतर अजित पवार यांनी आज मुंबईत राजभवन येथे जाऊन राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. (After being appointed as the Leader of the Opposition, Ajit Pawar meet to the Governor)

हेही वाचा – ४० आमदारांचा मुख्यमंत्री यात काळेबेरे, अजित पवारांना संशय

राज्यातील सत्तांतरानंतर विरोधी बाकावर राष्ट्रवादी काँग्रेस हा मोठा पक्ष झाला आहे. यामुळे विरोधी पक्षनेता म्हणून कोणाची निवड करण्यात येईल याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून होते. विरोधी पक्षनेता पदाच्या शर्यंतीत अजित पवार यांच्याबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार यांची नावेही होती. मात्र शेवटी सर्वांनी अजित पवार यांच्याच नावाला पसंती दिली होती. त्यानंतर विश्वासदर्शक ठराव मतदान झाल्यानंतर अध्यक्षांना अजित पवार हेच विरोधी पक्षेनेते असतील असे पत्र देण्यात आले होते. मात्र त्याची घोषणा आता करण्यात आली आहे.

हेही वाचा – राजकारणात अजित पवारांच्या प्रेमाची दादागिरी चालते; फडणवीसांकडून अजित पवारांवर स्तुतिसुमने

अजित पवार हे त्यांच्या रोखठोक आणि आक्रमक भूमिकेसाठी ओळखले जातात. सरकारमध्ये असतानाही त्यांनी अनेकवेळा विरोधी पक्षाला कधी कोपरखळ्या मारत तर कधी सडेतोड जाब विचारत हैराण केल्याचे अनेकवेळा पाहण्यात आले आहे. तसेच त्यांच्याबद्दल सगळ्यांनाच आदरयुक्त धाकही आहे. विरोधी पक्षेनेतेपदी अशीच व्यक्ती असणे अपेक्षित असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने अजित पवार यांच्या नावावर शिक्का केले. दरम्यान अजित पवार यांनी चार वेळा उपमुख्यमंत्रीपद भूषविले आहे.

हेही वाचा यापुढे सभागृहात एकही कायदा विनाचर्चा होणार नाही – अजित पवार

विरोधी पक्षनेते म्हणून नियुक्ती झाल्यानंतर अजित पवारांनी नारायण राणे यांचं कौतुक केलं. ते म्हणाले की, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी विरोधी पक्षात काम केलं आहे. शिवसेनेत विरोधी पक्षात काम करताना नारायण राणेंचा दरारा जरा जास्तच होता. त्यांनी मागं जरी वळून पाहिलं तरी सगळे चिडीचूप व्हायचे. सगळेच जण खाली बसायचे, त्यामुळे असला दरारा मी कधीच पाहिला नव्हता. शिवसेनेत अशा प्रकारचा दरारा मी दुसऱ्या कोणामध्ये कधीही बघितला नाही, असं अजित पवार काल म्हणाले होते.