राजकारणात अजित पवारांच्या प्रेमाची दादागिरी चालते; फडणवीसांकडून अजित पवारांवर स्तुतिसुमने

ajit pawar will be opposition leader in maharashtra-assembly devendra fadanvis reacts

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची विधानसभेच्या अजित पवार यांची विरोधी पक्ष नेतेपदी निवड करण्यात आली आहे. अजित पवारांची विरोधी पक्ष नेतेपदी निवड झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसा यांनी त्यांचं अभिनंदन केले. तसेच राजकारणात अजित पवारांची प्रेमाची दादागिरी चालते, अशा शब्दात फडणवीसांनी अजित पवारांवर स्तुतिसुमने उधळली आहेत.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, राजकारणात त्यांच्या प्रेमाची दादागिरी मोठ्याप्रमाणात चालते. त्या दादागिरीमध्ये एक शिस्त, परखडपणा आहे. त्यासोबत दिलेला शब्द कोणत्याही परिस्थिती मोडला नाही पाहिजे, जे राजकारणात कठीण जाते… परंतु या महाराष्ट्रात लोकं सातत्याने उल्लेख करतात की, अजित पवारांनी एखादा शब्द दिला तर कधी मोडला जात नाही, खरं तर आमच्या राष्ट्रवादीच्या घडाळ्याचे काटे जे आहेत, 10 वाजून 10 मिनिटांनी स्थिर आहेत पण अजित पवार वक्तेशीर आहेत.

संपूर्ण व्यवस्थेमध्ये अनेक वेळा आपण इतके जनतेमध्ये असतो, त्यावेळी आपण कारण सांगतो की, इतके लोकं होते की ज्यामुळे वेळ पाळू शकलो नाही, कितीही लोकं असले तरी त्या लोकांशी बोलून वेळेवर प्रत्येक बैठकीला उपस्थित राहणार. मागच्या काळात मंत्रालय बंदच राहणार होते. मात्र त्यांच्यामुळे ते उघडाव लागायचं. सकाळ – सकाळ ते जाऊन बसायचे रात्र रात्र भर बसायचे. अतिशय शिस्तीत सगळी काम करताना आपण त्यांना बघितलं. एक गोष्ट खरी आहे की, रोखठोकपणे कोणीही आमदार गेला काम होणार असेल तर करायचं नाही होणार नसेल तर कोणत्याही पक्षाचा आमदार असो स्वत:च्या पक्षाचा असो वा दुसऱ्या पक्षाचा त्याला तोंडावर सांगायचं होऊ शकणार नाही, करणार नाही, अशा शब्दात फडणवीसांनी अजित पवारांचे कौतुक केले.

असंही म्हटलं. ग्रामीण, क्रीडा, शेती अशा सर्वच क्षेत्रांची फस्ट हँड माहिती अजित पवारांना आहे. अजित पवारांच्या सूचनांचा नक्कीच सरकारला फायदा होईल असं सांगतानाच अजित पवारांच्या प्रगल्भतेचा आणि सल्लांचा आम्ही नक्कीच विचार करु.. तसेच तुम्ही या पदावर असेपर्यंत नक्कीच ही जबाबदारी यशस्वीपणे पार पडाल असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला.


…तेव्हापासून मुख्यमंत्रिपद अजित पवारांना हुलकावणी देतंय- देवेंद्र फडणवीस