दोन्ही मतदारसंघात विजय भाजपाचाच.., चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केला विश्वास

chandrakant patil

पुण्यातील कसबा पेठ आणि पिंपरी-चिंचवड पोटनिवडणुकीचे बिगुल वाजले आहेत. या निवडणुकीत भाजपाने आपले दोन उमेदवार मैदानात उतरवले असून त्यांची उमेदवारीही जाहीर केली आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी भाजपकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत. कसबा मतदारसंघासाठी हेमंत रासने आणि पिंपरी-चिंचवडमधील पोटनिवडणुकीसाठी अश्विनी लक्ष्मण जगताप यांची उमेदवारी पक्षनेतृत्वानं जाहीर केली आहे. दरम्यान, दोन्ही मतदारसंघात विजय भाजपाचाच होणार , असा विश्वास भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

चंद्रकांत पाटील यांनी ट्वीट करत या निवडणुकीत भाजपाचा विजय होणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. विधानसभेच्या कसबा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी हेमंत रासने आणि पिंपरी-चिंचवडमधील पोटनिवडणुकीसाठी अश्विनी लक्ष्मण जगताप यांची उमेदवारी पक्षनेतृत्वानं जाहीर केली आहे. या दोन्ही उमेदवारांना शुभेच्छा देतानाच या दोन्ही मतदारसंघात विजय भाजपाचाच होईल, असा विश्वासही व्यक्त करतो, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

पुण्याच्या माजी महापौर आणि भाजपच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी ही पोट निवडणूक होणार आहे. भाजपकडून ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी हालचाली सुरु केल्या होत्या. पण या पोटनिवडणूकींसाठी भाजपकडेच पाचहून अधिक इच्छुक उमेदवार होते. मात्र, पुण्यातील नेत्यांच्या बैठकीनंतर मुंबईतही राज्य पातळीवरील नेत्यांमध्ये खलबतं झाली आणि भाजपच्या उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला.


हेही वाचा : कसबा पेठ आणि चिंचवड पोट’निवडणूक’ होणारच; भाजपकडून अखेर उमेदवारांची घोषणा, कुणाचे नाव ठरले