सहकाऱ्यांना सोडून पळणारा मुख्यमंत्री नको तर सोबत नेणारा असावा, भुजबळांचा टोला

chhagan Bhujbal cm should not runs away leaving his colleagues
सहकाऱ्यांना सोडून पळणारा मुख्यमंत्री नको तर सोबत नेणारा असावा, भुजबळांचा टोला

मुख्यमंत्री ब्राम्हण असावा अशी इच्छा असल्याचे वक्तव्य केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले आहे. दानवेंच्या वक्तव्यावर शिवसेनेकडून प्रत्युत्तर देण्यात आले होते. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री सहकाऱ्यांना सोडून पळणारा नको तर सोबत नेणारा असावा असे वक्तव्य करत भाजपवर निशाणा साधला आहे. राज्याचे बहुमतच मुख्यमंत्री कोण ते ठरवत असते असेही भुजबळ म्हणाले आहेत.

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांबाबत सुरु असलेल्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्री ब्राम्हण असावा असे म्हणाले आहेत. यावर भुजबळांनी रावसाहेब दानवे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाव न घेता टोला लगावला आहे. मुख्यमंत्री ब्राम्हण असावा, दलीत असावा ओबीसी असावा की, मराठा किंवा आणखी कोणी असावा हे राज्यातील जनतेच्या बहुमतावर ठरेल. परंतु पुरोगामी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी जो रोडमॅप घालून दिला आहे. त्यावर चालणारा असला पाहिजे. त्यांनी जे आदर्श घालून दिले आहेत. त्यानुसारच शरद पवार, वसंतदादा पाटील यांनी काम केले आहे. जनतेची काळजी घेणारा आणि गरीबांच्या प्रश्नांचा विचार करणारा असावा.

मुख्यमंत्री ब्राम्हण असावा – दानवे

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी जालना दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री ब्राम्हण असावा असे म्हटलं आहे. मी ब्राह्मणाला केवळ नगरसेवक किंवा नगराध्यक्ष झालेला पाहू इच्छित नाही. मी ब्राह्मणाला या राज्याचा मुख्यमंत्री झालेला पाहू इच्छितो असे वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी केले आहे.


हेही वाचा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कोणत्याही मतदार संघातून निवडणूक लढवावी, नवनीत राणांचे मुख्यमंत्र्यांना आव्हान