मराठा समन्वयक, छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेवर गंभीर आरोप; म्हणाले, ”संभाजीराजे छत्रपतींसोबत…”

शिवसेनेनं कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांना उमेदवारी जाहीर केली आहे. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी माहिती दिली असून, याबाबत अधिकृत घोषणा बाकी आहे. परंतु, शिवसेनेने संजय पवार यांच्या नावाची घोषणा केल्यानंतर मराठा (Maratha) समन्वयक आणि छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

Rajya Sabha Election 2022 Sambhaji Raje turn back to Shiv Sena party entry offer

शिवसेनेनं कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांना उमेदवारी जाहीर केली आहे. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी माहिती दिली असून, याबाबत अधिकृत घोषणा बाकी आहे. परंतु, शिवसेनेने संजय पवार यांच्या नावाची घोषणा केल्यानंतर मराठा (Maratha) समन्वयक आणि छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. शिवसेनेने संभाजीराजे छत्रपतींसोबत (Sambhajiraje Chatrapati) विश्वासघात केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

शिवसेनेकडून संभाजीराजे छत्रपती यांनी शिवसेना प्रवेशाचा प्रस्ताव देण्यात आला होता. मात्र हा प्रस्ताव डावलल्यानंतर शिवसेनेने राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेने आपला दुसरा उमेदवार म्हणून संजय पवार यांच्या नावाची घोषणा केली. या घोषणेनंतर संभाजीराजे छत्रपती मुंबईत ट्रायडंट हॉटेलमध्ये दाखल झाले. शिवाय ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता आहे. त्यावेळी छावा संघटनेचे धनंजय जाधव, अंकुश कदम, विनोद साबळे, महेस डोंगरे, गंगाधर काळकुटे याच्यासह मराठा समाजातील तरुण ट्रायडंट हॉटेलसमोर पोहोचले होते. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना संताप व्यक्त केला.

हेही वाचा – खासदार संजय राऊतांचा २८ मे रोजी कोल्हापूर दौरा, जाहीर सभा घेणार

“संभाजीराजे छत्रपतींनी दिल्ली मुंबईत सर्वपक्षीय नेत्यांच्या भेट घेतल्या होत्या. या जागेसाठी मला तुमचं सहकार्य हवं असे त्यांनी सर्वपक्षीय नेत्यांना सांगितलं होतं. तसेच, शरद पवारांनी नांदेडमध्ये आम्ही आमची शिल्लक राहिलेली मतं संभाजीराजेंना देऊ असे जाहीररित्या सांगितलं होतं. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उदय सामंत, अनिल देसाई, अनिल परब आणि संजय राऊत असतील. या सगळ्यांना माहिती होतं. याबाबत चर्चा खूप पुढे गेली होती. एक ड्राफ्ट ठरला होता.”

“संभाजीराजेंना शिवबंधन बांधण्यात अडचण असेल तर त्यांना शिवसेना पुरस्कृत कसे करता येईल. या पद्धतीचा ड्राफ्ट एका मंत्र्याच्या बंगल्यात तयार झाला होता. त्यानंतर शिवसेनेच्या शिष्टमंडळाची आणि संभाजीराजेंची ट्रायडंट हॉटेलमध्ये चर्चा झाली होती. तिथे संभाजीराजेंना पुरस्कृत करण्याबाबत चर्चा झाली. आजही वेळ गेलेली नाही. सन्माननीय पवार साहेबांवर लागलेला विश्वासघातकीचा डाग पुसण्याची ही संधी आहे. पवार साहेब, आणि उद्धव ठाकरेंनी छत्रपतींना दिलेला शब्द फिरवता कामा नये”, अशी प्रतिक्रिया मराठा समन्वयक आणि छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

यावेळी मराठा समन्वयक आणि छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसोबत ओपन टेबल मिटिंग घेण्याचे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना आवाहन दिले. तसेच, त्यांनी दिलेली आश्वासनं जर खोटी असतील तर आम्ही इथं थांबू. परंतु तुम्ही जी गद्दारी केली आहे हे पुराव्यानिशी, ड्राफ्ट घेऊन, फोटोग्राफ्स घेऊन तुमचा चेहरा उघड करणार, असा इशाराही मराठा समन्वयकांनी यावेळी दिला.


हेही वाचा – राष्ट्रवादीच्या ओबीसी सेलचे उद्या मुंबईत राज्यस्तरीय अधिवेशन