घरठाणेउल्हासनगर, नाशिकमधील नगरसेवक-पदाधिकारी आमच्यासोबतच - एकनाथ शिंदे

उल्हासनगर, नाशिकमधील नगरसेवक-पदाधिकारी आमच्यासोबतच – एकनाथ शिंदे

Subscribe

उल्हासनगरचे १७ आणि नाशिकचे अनेक नगरसेवक पदाधिकारी आम्हाला पांठिबा देतायेत, असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. त्यांनी आज दुपारी ठाण्यातील आनंद दिघे यांच्या आश्रमात भेट दिली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधला.

गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेतेली अनेक निष्ठावान कार्यकर्ते, नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना समर्थन दिले आहे. त्यातच, आज उल्हासनगरमधील १७ नगरसेवक शिंदे गटात सामील झाले तर, नाशिकमधीलही अनेक नगरसेवकांनी शिंदे गटाला समर्थन दिले आहे. त्यामुळे उल्हासनगरचे १७ आणि नाशिकचे अनेक नगरसेवक पदाधिकारी आम्हाला पांठिबा देतायेत, असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. त्यांनी आज दुपारी ठाण्यातील आनंद दिघे यांच्या आश्रमात भेट दिली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. (Corporator from Ulhasnagar, Nashik with us says Eknath Shinde)

हेही वाचा – बाळासाहेबांच्या आशीर्वादामुळेच मी आज मुख्यमंत्री, एकनाथ शिंदेंनी केले शिवसेनाप्रमुखांना स्मरण

- Advertisement -

राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व सामान्य कार्यकर्ता म्हणून मी काम करीत आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि स्व. आनंद दिघे यांच्या शिकवणीनुसार आम्ही काम करतोय जेणेकरून सामान्य नागरिकांच्या जीवनात बदल घडून येईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे व्यक्त केला.

गुरूपौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री शिंदे येथील टेंभी नाक्यावरील आनंदाश्रमामध्ये आले होते. यावेळी त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि स्व. आनंद दिघे यांच्या प्रतिमेचे पूजन करीत त्यांना अभिवादन केले. आमदार संजय शिरसाट, भरत गोगावले, प्रताप सरनाईक, डॉ. बालाजी किणीकर, रविंद्र फाटक, ठाणे महापालिका आयुक्त विपीन शर्मा, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर आदींसह नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

- Advertisement -

हेही वाचा – ठाकरेंना बोलू नका; किशोरी पेडणेकरांकडून केसरकरांना सुनावले

यावेळी माध्यमांशी बोलतांना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, गुरूपौर्णिमेनिमित्त आज शिवसेना प्रमुख बाळासेहब ठाकरे आणि स्व. आनंद दिघे यांना वंदन केले. या दोघांची शिकवण आचरणात आणून सामान्यांना न्याय देण्याचा आमचा प्रयत्न राहील. राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी स्व. दिघे यांना वंदन करण्यासाठी तसेच मुख्यमंत्री शिंदे यांनी शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांकडून शुभेच्छांचा स्विकार केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -