घरमहाराष्ट्रएसटी कर्मचाऱ्यांना मिळणार महागाई भत्ता; राज्य सरकारचा मोठा निर्णय

एसटी कर्मचाऱ्यांना मिळणार महागाई भत्ता; राज्य सरकारचा मोठा निर्णय

Subscribe

एसटी कर्मचाऱ्यांना मात्र 28 टक्के भत्ता देण्यात आला.

राज्यात शिंदे – फडणवीस (cm eknath shinde – dcm devendra fadnavis) सरकार स्थापन झाल्यापासूनच या सरकारने अनेक महत्वपूर्ण निणर्य घेतले आहेत. अशातच मागील अनेक महिन्यांपासून राज्यातील एसटी कर्मचारी त्यांच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी आवाज उठवत आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना (ST employees) 34 टक्के बहागाई (Bereavement Allowance) भत्ता देण्याचे जाहीर केले आहे.

हे ही वाचा –   श्रद्धाच्या शरीराची विटंबना माणुसकीला काळीमा फासणारी, आफताबला फाशी द्या; रुपाली चाकणकरांची मागणी

- Advertisement -

राज्यातील शिंदे – फडणवीस (cm eknath shinde – dcm devendra fadnavis) सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. त्या संदर्भांत राज्य सरकारने एसटी महामंडळाला पत्र सुद्धा पाठविले आहे. दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच 34 टक्के महागाई भत्ता (Bereavement Allowance) देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय मागील काही काळापासून राखडला होता. राज्य सरकार कडून हा निर्णय घेण्यास उशीर होत असल्याने एसटी कामगार संघटना आक्रमक झाली होती.

हे ही वाचा – पुन्हा एकदा पाकिस्तानी कलाकारांना विरोध, मनसेचा चित्रपट निर्मात्यांना इशारा

- Advertisement -

एसटी कामगार (ST employees) संघटना आक्रमक होत त्यांच्याकडून थेट आंदोलनाचा इशारा देण्यात आला. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 34 टक्के महागाई भत्ता असून, एसटी कर्मचाऱ्यांना मात्र 28 टक्के भत्ता देण्यात आला. एसटी कर्मचाऱ्यांना त्यावरच समाधान मानावे लागत होते. दरम्यान राज्य सरकारच्या या निर्णयामुळे आता राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

हे ही वाचा – मुख्यमंत्र्यांच्या दबावाखाली पोलिसांनी मला ताब्यात घेतले; संजय निरुपमांचा आरोप

 

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -