फडणवीसांचे खडसेंवर लक्ष; काय आहे कारण?

फडणवीस खडसे यांना म्हणाले, तुम्ही त्या दिवशी माझ्या भाषणाच्या वेळेस उशीरा आलात. माझे तुमच्याकडे लक्ष होते. यावर एकनाथ खडसे म्हणाले म्हणजे माझ्याकडे लक्ष आहे तुमचे. तुमच्याकडे लक्ष आहेच. पण आता गटनेते झालात त्यामुळे जास्त लक्ष दिले पाहिजे, असा टोला फडणवीस यांनी हाणला. पुढे फडणवीस म्हणाले, नाथाभाऊ तुम्ही राष्ट्रवादीमध्ये गेल्यापासून विदर्भाला विसरलात. कारण तुम्ही बोलले पाहिजे होते की समृद्धी महामार्ग चांगला आहे. ते बोलला नाहीत.

Maharashtra Assembly Budget 2023 | मुंबई – हिवाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यात खडाजंगी बघायला मिळाली. अर्थसंकल्पीय अधिवेशनातही या दोन्ही नेत्यांमध्ये टोलेबाजी सुरुच आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी शुक्रवारी खडसे यांच्यावर निशाणा साधला. तर खडसे यांनीही जशास तसे उत्तर दिले.

फडणवीस खडसे यांना म्हणाले, तुम्ही त्या दिवशी माझ्या भाषणाच्या वेळेस उशीरा आलात. माझे तुमच्याकडे लक्ष होते. यावर एकनाथ खडसे म्हणाले म्हणजे माझ्याकडे लक्ष आहे तुमचे. तुमच्याकडे लक्ष आहेच. पण आता गटनेते झालात त्यामुळे जास्त लक्ष दिले पाहिजे, असा टोला फडणवीस यांनी हाणला. पुढे फडणवीस म्हणाले, नाथाभाऊ तुम्ही राष्ट्रवादीमध्ये गेल्यापासून विदर्भाला विसरलात. कारण तुम्ही बोलले पाहिजे होते की समृद्धी महामार्ग चांगला आहे. ते बोलला नाहीत.

राष्ट्रवादी कॉंग्रेसने खडसे यांची गटनेते पदी नियुक्ती केली आहे. त्यानंतर या दोन्ही नेत्यांमध्ये विधानपरिषदेत खडाजंगी बघायला मिळाली. यापुढेही सभागृहात या दोन्ही नेत्यांमध्ये चढाओढ बघायला मिळेल, असे बोलले जात आहे.

एकनाथ खडसे हे नेहमीच सभागृहात आक्रमक असतात. गेल्या महिन्यात कांदा प्रश्नी त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर चांगलीच टीका केली.  एकनाथ खडसे यांनी कांदा आणि कापूस प्रश्नावर सभागृहात चर्चेला सुरुवात केली. यावेळी त्यांनी गिरीश महाजनांच्या उपोषणाची आठवण सांगितली. कापसाला सहा ते सात हजार रुपये भाव देण्याच्या मागणीसाठी महाजन आमरण उपोषणाला बसले होते. उपोषणामुळे महाजनांची स्थिती वाईट झाली. त्यांनी गोपीनाथ मुंडेंचा धावा धरला. खडसे साहेब लवकर मुंडे साहेबांना घेऊन या, उपोषण सोडवा, असा आग्रह ते करु लागले होते. कांदा आणि कापसाला योग्य भाव मिळण्यासाठी उपोषण करणारे तेच गिरीश महाजन आज देवेंद्र फडणवीसांच्या खांद्याला खांदा लावून मंत्रिमंडळात मंत्री आहेत. तेव्हा त्यांनी आपल्या उपोषणाची आठवण ठेवून कांदा आणि कापूस प्रश्नावर शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला पाहिजे, असा चिमटा एकनाथ खडसे यांनी काढला होता.

हिवाळी अधिवेशनातही विदर्भाच्या मुद्द्यावरुन एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला होता. स्वतंत्र विदर्भ झाल्याशिवाय विवाह करणार नाही, अशी भीष्म प्रतिज्ञा फडणवीस यांनी केली होती. मात्र त्यांनी विवाह केला, याची आठवण खडसे यांनी करुन दिली. याला फडणवीस यांनीही चोख उत्तर दिले. मी विवाह करत होतो, तेव्हा मला थांबवायचे होते, असे उत्तर फडणवीस यांनी खडसेंना दिले.