काश्मीरमध्ये जाऊन हनुमान चालिसा वाचणार, मुख्यमंत्र्यांचे आव्हान नवनीत राणांनी स्वीकारले

एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत नवनीत राणा यांनी काश्मीरमध्ये जाऊन हनुमान चालिसाचं वाचन करणार असल्याचं सांगितलं आहे.

हनुमान चालिसावरून राज्यातील वातावरण तापलेलं असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कालच्या औरंगाबादच्या सभेत यावरून विरोधकांवर निशाणा साधला. त्यावरून खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्र्यांचं आव्हान स्वीकारलं आहे. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत नवनीत राणा यांनी काश्मीरमध्ये जाऊन हनुमान चालिसाचं वाचन करणार असल्याचं सांगितलं आहे. (Going to Kashmir to read Hanuman Chalisa, Navneet Rana accepted the Chief Minister’s challenge)

हेही वाचा – ढेकणं चिरडायला तोफेची गरज नसते – उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

काश्मीरमध्ये जाऊन हनुमान चालीसा वाचा असं आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना दिलं होतं. त्यावरून नवनीत राणा यांनी हे आव्हान स्विकारलं आहे. आव्हान स्विकारताना नवनीत राणा म्हणाल्या की, काश्मीर हे भारताचं अंग आहे आणि तिथे जाऊन हनुमान चालिसाचं पठण करणं कठीण आहे असं उद्धव ठाकरेंना वाटत असेल तर मी तिथे जाऊन नक्की वाचन करेन.

हेही वाचा – खार पोलिसांनी नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या विरुद्ध दाखल केले आरोपपत्र

नवनीत राणा पुढे म्हणाल्या की, औरंगाबादच्या सभेत ठाकरेंनी तेथील स्थानिक समस्यांवर बोलणं अपेक्षित होतं. पण ते हनुमान चालीसाबाबत बोलले. तिथली जनता पाण्याने हैराण असताना त्यावर तोडगा काढणे गरजेचे आहे. पण उद्धव ठाकरे यांना विरोधकांना टार्गेट करणं महत्त्वाचं वाटलं.