घरताज्या घडामोडीगुरुवारपासून दोघांनी हेल्मेट न घातल्यास कारवाई अटळ

गुरुवारपासून दोघांनी हेल्मेट न घातल्यास कारवाई अटळ

Subscribe

दुचाकी (Two wheeler) चालवणाऱ्या चालकांसाठी एक महत्वाची बातमी आहे. मुंबईत आता दुचाकी चालवणाऱ्यासह मागे बसणाऱ्या व्यक्तीला हेल्मेट सक्ती (helmet compulsory) करण्यात आली आहे. यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांकडून (Mumbai Traffic Police) १५ दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला होता.

दुचाकी (Two wheeler) चालवणाऱ्या चालकांसाठी एक महत्वाची बातमी आहे. मुंबईत आता दुचाकी चालवणाऱ्यासह मागे बसणाऱ्या व्यक्तीला हेल्मेट सक्ती (helmet compulsory) करण्यात आली आहे. यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांकडून (Mumbai Traffic Police) १५ दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला होता. या अल्टिमेटमचा उद्या शेवटचा दिवस असून, गुरूवार म्हणजेच ८ जूनपासून संपूर्ण मुंबईत हेल्मेटसक्ती लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे दुचाकीस्वार आणि दुचाकीवर मागे बसलेल्या व्यक्तीला हेल्मेट घालणे बंधनकारक असणार आहे. (helmet is mandatory for both riders else action will be take from 8 June)

नियम न पाळणाऱ्यांवर कठोर कारवाई

- Advertisement -

वाहतूक विभागाकडून (Traffic Department) १५ दिवसांत या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे याआधीच सांगण्यात आले होते. तसेच, नियम न पाळणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार असल्याचेही सांगण्यात आले होते.

दुचाकीलस्वार आणि त्याच्या पाठीमागे बसलेल्या व्यक्ती यांनी दुचाकी चालवताना हेल्मेट वापरणे वाहन कायदा 1988 कलम 129 सह 194 (ड) अन्वये बंधनकारक आहे. विना हेल्मेट मोटारसायकल चालविल्यास मोटार वाहन कायद्यामध्ये 500 रुपये दंड तसेच 3 महिन्यांसाठी लायसन्स निलंबित करण्याची तरतूद करण्यात आली आहे.

- Advertisement -

लायसन्सही तीन महिन्यांसाठी सस्पेंड

त्यामुळे आता पोलियन रायडरने हेल्मेट घातलेले नसेल तर त्याचा फटका दुचाकीस्वाराला बसणार आहे. सोबत वाहन चालकाचे लायसन्सही तीन महिन्यांसाठी सस्पेंड करण्यात येणार आहे. २५ मे रोजी याबाबत पत्रक काढण्यात आले होते.

दरम्यान, कोणतेही वाहन चालवताना वाहतुकीच्या नियमांचे (Traffic Rules) पालन करण्याच्या सुचना वारंवार वाहतूक पोलिसांकडून दिल्या जातात. मात्र, अनेकदा दुचाकीस्वार या नियमांचे उल्लंघन करतात. त्यामुळे त्यांना दंडात्मक कारवाईला सामोरे लागते. अशातच आता, चालकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने वाहतूक विभागाने हेल्मेट सक्तीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दुचाकीवरील दोघांनाही हेल्मेट घालणे बंधनकारक असणार आहे.


हेही वाचा – हेल्मेट घातले असतानाही कापले जाणार 2000 रुपयांचे चलान; जाणून घ्या नवा वाहतुकीचा नियम

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -