घरमहाराष्ट्रसंसद भवनाच्या ऐतिहासिक कामामुळे विरोधकांना पोटदुखी, मुख्यमंत्री शिंदेंची टीका

संसद भवनाच्या ऐतिहासिक कामामुळे विरोधकांना पोटदुखी, मुख्यमंत्री शिंदेंची टीका

Subscribe

संसद भवन उद्घाटन कार्यक्रमाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. या ऐतिहासिक इमारतीच्या कामाचे श्रेय पंतप्रधान मोदी यांना मिळेल म्हणून विरोधकांची पोटदुखी सुरु आहे, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

येत्या 28 मेला देशाची ऐतिहासिक वास्तू असलेल्या नव्या संसद भवनाच्या इमारतीचे उद्घाटन करण्यात येणार आहे. या उद्घाटनाच्या कार्यक्रमावर देशातील 19 विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे विरोधक विरूद्ध सत्ताधारी अशी खडाजंगी सध्या सुरू आहे. नव्या संसद भवनाच्या कार्यक्रमातून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना डावलण्यात आल्याचा आरोप करून विरोधकांना या कार्यक्रमाला हजर राहण्यास नकार दिल्याचे सांगण्यात आले आहे. पण आता या कार्यक्रमाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. या ऐतिहासिक इमारतीच्या कामाचे श्रेय पंतप्रधान मोदी यांना मिळेल म्हणून विरोधकांची पोटदुखी सुरु आहे, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

हेही वाचा – काय आहे ‘शासन आपल्या दारी योजना’, स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी सांगितले

- Advertisement -

औरंगाबादमधील कन्नड तालुक्यात “शासन आपल्या दारी” कार्यक्रमाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी या कार्यक्रमातून त्यांनी विरोधकांवर टीका केली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, “उद्या संसद भवनाचे उद्घाटन करायचे आहे. पण त्याला विरोध करण्यात येत आहे. संसद भवन पवित्र मंदिर आहे. तिथे सर्व खासदार जाऊन बसतात, जनतेचे प्रश्न मांडतात. हे तर ऐतिहासिक काम असून, याला काय विरोध करतात. याचा अर्थ ही पोटदुखी आहे. या कामाचे मोदींना श्रेय मिळेल म्हणून विरोधकांची पोटदुखी सुरु आहे.” असे म्हणत त्यांनी विरोधकांवर टीका केली.

केजरीवालांच्या मुंबई दौऱ्यावर केली टीका
दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टी या पक्षाचे प्रमुख असलले अरविंद केजरीवाल हे दोन दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर होते. त्यांनी मुंबईत येताच पहिल्या दिवशी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी काल गुरुवारी (ता. 25 मे) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी त्यांचा स्वागत केले. पण या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर खोचक टीका केली.

- Advertisement -

तर केजरीवाल मुंबईत येतात ते एकाला भेटतात, दुसऱ्याला भेटतात आणि दुसरे तिसऱ्याला तिसरे पाचव्याला भेटत आहेत. हे त्याच्या दारी आणि ते त्याच्या दारी जात आहेत. पण आपण कोणाच्या दारी जात नाही. त्यामुळे किती आले किती गेले आणि कितीही आघाड्या झाल्या तरी एकटे मोदी सर्वांना भारी आहेत, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीकास्त्र डागले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -