राज्यातील ‘या’ १३ जिल्ह्यांना हवामान विभागाकडून चार दिवस यलो अलर्ट

मागील काही दिवसांपासून राज्याच्या (Maharashtra) अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे. विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस (heavy Rainfall) पडत आहे.

Mumbai Rains unseasonal rain forecast hailstorm along with rains from january 7 to 11 january
Mumbai Rains : मुंबई, ठाण्यासह बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी

मागील काही दिवसांपासून राज्याच्या (Maharashtra) अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे. विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस (heavy Rainfall) पडत आहे. शिवाय हवामान विभागही सक्रीय झाले असून, पावसाचा अंदाज (Prediction) वारंवार वर्तवत आहेत. काही दिवसांपूर्वी हवामान विभागाकडून मुंबईत १० जूनंतर पाऊस पडणार शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली होती. त्यानंतर आता हवामान विभागाकडून (IMD) राज्यातील १३ जिल्ह्यांना यलो अलर्ट (Yellow Alert) दिला आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, परभणी, पुणे, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये पुढील चार दिवस यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यानुसार, ६ ते ९ जूनपर्यंत १३ जिल्ह्यांमध्ये मान्सूनपूर्व पावसाचा इशारा दिला आहे. सध्या मान्सुन सरींसाठी परिस्थिती अनुकूल नाही.

हेही वाचा – नालेसफाई १०५ टक्के झाल्याचा पालिकेचा दावा, ७० मिमी पेक्षा जास्त पाऊस पडल्यास मुंबईची तुंबई होणार

६ ते ९ जून या कालावधीमध्ये हवेचा दाब काही भागांमध्ये किंचित कमी होत आहे. दरम्यान, यावर्षी मान्सून १६ मे रोजी दाखल झाला. त्यानंतर केरळमध्येही (Kerala) ४ दिवस अगोदर दाखल झाल्याने आनंदाचे वातावरण होते, पण अरबी समुद्रात आल्यानंतर मान्सूनचा वेग मंदावला आहे.

घरांची छप्पर उद्ध्वस्त

कोल्हापूरमध्ये आज केवळ ३० मिनिटे पाऊस झाला झालेल्या पावसाने अक्षरश: थरकाप उडाला. अनेक ठिकाणी घरांची छप्पर उद्ध्वस्त झाली. पत्र्याचे शेड उद्ध्वस्त झाले. राजारामपुरी परिसरातही मुसळधार पावसाने झाड कोसळले.


हेही वाचा – राणा दाम्पत्याच्या अडचणीत वाढ; मुंबई पोलिसांनी बजावली नोटीस