घरताज्या घडामोडीआंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर बनवा, औरंगाबादच्या नामांतरावरून इम्तियाज जलील यांची टीका

आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर बनवा, औरंगाबादच्या नामांतरावरून इम्तियाज जलील यांची टीका

Subscribe

आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर बनवा आणि मग आम्ही स्वतः तुमच्याकडे शहराचं नाव छत्रपती संभाजी महाराज ठेवा असा प्रस्ताव घेऊन येऊ, असं AIMIM चे इम्तियाज जलील यांनी म्हटलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून आमच्यावर अनेक निर्णय लादले जात आहे. लोकशाहीत राहत असतानाही हुकुमशाही सहन करावी लागत आहे. छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेऊन राजकीय पोळ्या भाजल्या जात आहेत. आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर बनवा आणि मग आम्ही स्वतः तुमच्याकडे शहराचं नाव छत्रपती संभाजी महाराज ठेवा असा प्रस्ताव घेऊन येऊ, असं AIMIM चे इम्तियाज जलील यांनी म्हटलं आहे. औरंगाबादमध्ये त्यांनी आज जाहीर सभा घेतली. यावेळी ते बोलत होते. (Imtiyaj Jalil on Rename of Auranagabad)

हेही वाचा – औरंगाबादचं नामांतर झाल्यास १००० कोटींचा बोजा पडणार, एमआयएमचा दावा

- Advertisement -

नामांतर हे सेना-भाजपचं षडयंत्र आहे. खुर्ची जात असताना उद्धव ठाकरेंनी हा निर्णय घेतला असल्याची टीकाही जलील यांनी यावेळी केली. देश बाबासाहेबांच्या संविधानावरच चालणार. देशात लोकशाही आहे. त्यामुळे इथे हुकुमशाही चालणार नाही, असंही त्यांनी ठणकावून सांगितलं. जोरजबरदस्ती करून निर्णय लादले जात आहे. छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेऊन राजकीय पोळ्या भाजल्या जात आहेत, असंही इम्तियाज जलील म्हणाले.

हेही वाचा  – औरंगाबाद, उस्मानाबाद शहरांच्या नामांतरावर शरद पवारांची नाराजी

- Advertisement -

दरम्यान, औरंगाबाद शहराचं नामांतर करून संभाजीनगर असं ठेवण्यात आलं आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने जीआर काढून या शहराचं नाव बदललं होतं. मात्र, या नामांतरावरून आता काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि AIMIM पक्षाने नाराजी व्यक्त केली आहे. हा निर्णय सर्वानुमते घेतला असं सांगण्यात येत असलं तरीही ठाकरेंनी खुर्ची जात असताना आयत्यावेळेला हा निर्णय घेतला असल्याचा आरोप अनेकांनी केला आहे. तसेच, शरद पवार यांनीही या नामांतरावरून नाराजी व्यक्त केली आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -