घरमहाराष्ट्र'जीवनाधार'चे कार्य गौरवास्पद, ‘मुंबै महोत्सवा’च्या वेबसाइटचे अरविंद सावंतांच्या हस्ते अनावरण

‘जीवनाधार’चे कार्य गौरवास्पद, ‘मुंबै महोत्सवा’च्या वेबसाइटचे अरविंद सावंतांच्या हस्ते अनावरण

Subscribe

मुंबई : जीवनाधार फाऊण्डेशनने सामाजिक क्षेत्रात फारच महत्त्वपूर्ण काम केले आहे. मुंबै महोत्सवाच्या माध्यमातून मुंबईचा नावलौकिक वाढवणार्‍या व्यक्तींचा सन्मान केला जातो. त्यानिमित्ताने समाजाचे ऋण व्यक्त करण्याचा त्यांचा हा प्रयत्न फारच गौरवास्पद आहे, असे प्रतिपादन खा. अरविंद सावंत यांनी केले.

हेही वाचा – तू माझी स्वप्न सुंदरी आहेस… प्राजक्ताच्या लूकवर चाहत्याची कमेंट

- Advertisement -

जीवनाधार फाऊण्डेशनच्यावतीने 31 डिसेंबर 2023 ते 4 जानेवारी 2024 या कालावधीत होणाऱ्या सातव्या ‘मुंबै महोत्सवा’च्या वेबसाइटचे अनावरण खा. सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. जीवनाधार फाऊण्डेशनचे अध्यक्ष राजेश खाडे, सचिव अनिता खाडे, रंगकर्मी व मुंबै महोत्सवाचे क्रिएटीव्ह हेड श्रीनिवास नार्वेकर, नाट्यनिर्मात्या व समाजमाध्यम समन्वयक सुप्रिया चव्हाण, हेमंत वीर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

वेगवेगळ्या क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणार्‍या 19 व्यक्तींना ‘मुंबै गौरव सन्मान’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे, तर मुंबै भूषण, मुलखावेगळी माणसं, संस्थात्मक पातळीवर महत्त्वपूर्ण कार्य करणार्‍या संस्थेस सामाजिक कृतज्ञता सन्मान आणि ‘जीवनाधार जीवनगौरव सन्मान’ देऊन गौरवण्यात येणार आहे. ‘मुंबै महोत्सवा’चे वेगळेपण जपण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. त्यामध्ये अधिक वेगळेपणा आणण्याचा प्रयत्न आम्ही यावेळी केला आहे, असे अध्यक्ष राजेश खाडे म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – IPL 2024: IPL लिलावासाठी 1166 खेळाडूंची नोंदणी; मिचेल स्टार्कचाही समावेश

या वर्षी 2 ते 4 जानेवारी या कालावधीत होणार्‍या पुरस्कार वितरण कार्यक्रमांव्यतिरिक्त ‘मुंबै सायक्लोथॉन’ ही पर्यावरणपूरक सायकल रॅली होणार आहे. ‘आगळावेगळा जोडी विशेष मराठमोळा पारंपरिक फॅशन शो’ हे या महोत्सवाचे वैशिष्ट्य आहे. 41 वाद्ये आणि 42 कलाकारांचा सामावेश असलेला ‘नाद’ हा फ्युजन बॅण्ड, लावणी कलाप्रकारातल्या बदलत्या भाषेचा आढावा घेणारा ‘ये लावणीचे बोल कौतुके’ आणि मराठमोळा ‘मराठी पाऊल पडते पुढे’ या वेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचा यामध्ये सामावेश आहे. ‘मुंबै महोत्सवा’मध्ये होणार्‍या सायक्लोथॉन व फॅशन शोबद्दल अधिक माहिती www.mumbaimahotsav.com या वेबसाईटवर मिळेल, असे आयोजकांनी म्हटले आहे.

हेही वाचा – MLA Disqualification Case : ठाकरे गटाने थेट पुरावा दाखवला; पण एकनाथ शिंदेंचा ई-मेल आयडी नेमका कोणता?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -