घरताज्या घडामोडीLok Sabha Election 2024 : हे मोदींचे नाही तर, अदानींचे सरकार; कॉंग्रेस...

Lok Sabha Election 2024 : हे मोदींचे नाही तर, अदानींचे सरकार; कॉंग्रेस नेता राहुल गांधींचा हल्लाबोल

Subscribe

देशातील जनतेला असं सांगितलं जातं की हे नरेंद्र मोदी यांचे सरकार आहे, पण खरतर हे सरकार अदानी यांचे आहे. एका उद्योगपतीचे हे सरकार आहे. तसेच देशात सर्वकाही अदानी यांच्यासाठी केले जाते, असं म्हणत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला.

भंडारा : देशातील जनतेला असं सांगितलं जातं की हे नरेंद्र मोदी यांचे सरकार आहे, पण खरतर हे सरकार अदानी यांचे आहे. एका उद्योगपतीचे हे सरकार आहे. तसेच देशात सर्वकाही अदानी यांच्यासाठी केले जाते, असं म्हणत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. (Lok Sabha Election 2024 congress leader rahul gandhi slams pm narendra modi says this Adani government)

भंडाऱ्यातील साकोली येथे काँग्रेस नेते राहुल गांधी यांची सभा झाली. या सभेत भाष्य करताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. “मागील दहा वर्षांत पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडलेल्या श्रीमंतांसाठी सरकार चालवले. या श्रीमंत उद्योगपतींची तुम्हाल नाव माहितच आहेत. यातील सर्वात मोठं नावं म्हणजे अदानी. ज्यावेळी नरेंद्र मोदी यांचे सरकार येते त्यावेळी अदानी यांच्या शेअरची किंमत मोठ्या प्रमाणात वाढते. देशातील जनतेला असं सांगितलं जातं की हे नरेंद्र मोदी यांचे सरकार आहे, पण खरतर हे सरकार अदानी यांचे आहे. एका उद्योगपतीचे हे सरकार आहे. तसेच देशात सर्वकाही अदानी यांच्यासाठी केले जाते”, असे म्हणत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला.

- Advertisement -

भारतातील सर्वच गोष्टी या अदानींच्या – राहुल गांधी

“महाराष्ट्रातील मुंबईत विमानतळ होते. कोणातरी दुसऱ्याच्या हातात हे विमानतळ होते, पण त्या व्यक्तीचीसीबीआयकडून चौकशी केली जाते, त्याच्यावर दबाव टाकला जातो, धमकावले जाते. त्यानंतर जादू होते आणि तो व्यक्ती ते विमानतळ अदानी यांच्याकडे सोपवतो. त्यानंतर सर्व चौकशा बंद होतात. अदानी हे महाराष्ट्रातील सर्वात मोठं विमानतळ चालवतात. हे केवळ विमानतळासोबत नाही झालेले तर, भारतातील अनेक गोष्टींसोबत असे घडले. पायभूत सुविधा निर्माण होतात, उड्डाणपूल तयार होतात, रस्ते तयार होतात पण सर्वांचे क्रेडीट अदानी यांनाच जाते. भारतातील सर्वच गोष्टी या अदानींच्या आहेत”, असाही टोला अदानींनी पंतप्रधान मोदींना लगावला.

हेही वाचा – Lok Sabha 2024 : विश्वासात घेऊन काम करा अन्यथा काँग्रेससारखी अवस्था होईल; भाजप नेत्याची पक्षावर नाराजी

- Advertisement -

पंतप्रधान मोदी जातीजातीत भांडण लावत असतात – राहुल गांधी

“भारतातील सर्वच गोष्टी या अदानी यांच्याकडे गेल्यामुळे झालं असं की, भारतातील 70 करोड लोकांकडे जेवढा पैसा आहे, तेवढाच पैसा 22 लोकांकडे आहे. असे असताना पंतप्रधान नरेद्र मोदी काय करतात तर, कधी महिलांवर, गरीबांवर भाष्य करतात. कधी हिंदू-मुस्लीम म्हणतात, तर कधी जातीजातीत भांडण लावतात. जेवढा टॅक्स गौतम अदानी देतात तितका टॅक्स तुम्ही भरत असतात. जीवनाश्यक वस्तूंवरही तुम्ही टॅक्स भरत असतात”, असे एकनाअनेक आरोप करत राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला.

जाहीरनामा काँग्रेस पक्षाचा नसून जनतेचा – राहुल गांधी

“आम्ही खूप विचार करून जाहीरनामा तयार केला आहे. हा जाहीरनामा बंद खोलीत तयार केला नसून, हजारो-लाखो लोक, शेतकरी, मजदूर, महिला, गरीब यांच्याशी बातचीत केल्यानंतर जाहीरनामा तयार करण्यात आला आहे. या जाहीरनाम्यावर जरी काँग्रेस पक्षाचे चिन्ह असले तरी, हा जाहीरनामा काँग्रेस पक्षाचा नसून जनतेचा आहे. तुमचा आवाज, तुमची मन की बात आम्ही मंचावर ठेवली आहे”, असेही राहुल गांधी यावेळी म्हणाले.


हेही वाचा – LOK SABHA ELECTION 2024 : यंदाच्या लोकसभेत देशात होणार कौटुंबिक लढती; वाचा सविस्तर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -