घरताज्या घडामोडीLok Sabha Election 2024 : अंगात नाही बळ आणि चिमटा काढून पळ;...

Lok Sabha Election 2024 : अंगात नाही बळ आणि चिमटा काढून पळ; मुख्यमंत्री शिंदेंचा मविआला टोला

Subscribe

Lok Sabha Election 2024 अंगात नाही बळ आणि चिमटा काढून पळ, अशी विरोधकांची अवस्था झाली आहे, असं म्हणत मुख्यमंत्री एकनात शिंदे यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला. तसेच, 'विरोधक सातत्याने पंतप्रधान मोदींवर आरोप आणि टीका करत असतात.

नागपूर : अंगात नाही बळ आणि चिमटा काढून पळ, अशी विरोधकांची अवस्था झाली आहे, असं म्हणत मुख्यमंत्री एकनात शिंदे यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला. तसेच, ‘विरोधक सातत्याने पंतप्रधान मोदींवर आरोप आणि टीका करत असतात. पण मोदी त्यांच्या आरोप-टीकांवर जराही लक्ष देत नाहीत. पण जर त्यांनी त्याकडे लक्ष दिले तर, फेसबुक लाईव्ह करण्याऱ्यांच्या तोंडाला फेस आल्याशिवाय राहणार नाही’, असं म्हणत एकनाथ शिदेंनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. (Lok Sabha Election 2024 CM Eknath Shinde Slams MVA and Uddhav Thackeray In Nagpur)

नागपूरमधील रामटेक लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. नागपूरातील कन्हानमध्ये ही सभा पार पडली. या सभेपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थितांना संबोधित केले. तसेच, महाविकास आघाडीवर टीका करत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

- Advertisement -

हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : नो बर्वे ओन्ली पारवे म्हणत फडणवीसांचा नागपुरातून मविआला टोला

“सध्या गर्मीची लहर असूनही प्रचंड प्रमाणात लोकं मोदींना भेटायला आली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण ऐकण्यासाठी आली आहेत. गर्मीपेक्षा मोठी मोदी प्रेमाची देशभरात लहर आहे. देशात सगळीकडे मोदींचा जयजयकार पहायला ऐकायला मिळतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी जातील तिथे प्रभु श्रीरामाच्या आशीर्वादाने आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशिर्वादाने सुशासन निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रत्येकाच्या मनात मोदी आहेत”, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

- Advertisement -

“सत्तेच्या खुर्चीसाठी लाचार झालेला विरोधी पक्ष मोदी द्वेषाने पीडित आहे. यांचे जीवन केवळ भ्रष्टाचार, घोटाळे आणि पैसे मोजण्यात गेले आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. अंगात नाही बळ आणि चिमटा काढून पळ, अशी विरोधकांची अवस्था झाली आहे. विरोधक सातत्याने पंतप्रधान मोदींवर आरोप आणि टीका करत असतात. पण मोदी त्यांच्या आरोप-टीकांवर जराही लक्ष देत नाहीत. पण जर त्यांनी त्याकडे लक्ष दिले तर, फेसबुक लाईव्ह करण्याऱ्यांच्या तोंडाला फेस आल्याशिवाय राहणार नाही”, असे म्हणत एकनाथ शिंदेंनी ठाकरेंवर हल्लाबोल केला.

“हाती चले बझार…कुत्ते भोंके हजार अशी विरोधकांची अवस्था आहे. जेवढे विरोधक पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आरोप करतात त्यांना जनता घरी बसवतो. 2014 ला अनेकांनी पंतप्रधानांवर आरोप केले होते. त्यांना जनतेने घरी बसवलं. 2019 ला अनेक विरोधकांनी आरोप केले त्यांनाही जनतेने घरी बसवलं. पण आता 2024 विरोधक पंतप्रधान नरेंद्र मोदींवर इतके आरोप करत आहेत की, त्यावरून मला वाटतं की मोदी सर्व रेकॉर्ड तोडतील, कारण जनतेने पुन्हा पंतप्रधानपदी मोदींना बसवण्याचा निर्णय घेतला आहे”, असेही शिंदे म्हणाले.

हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : भाजपची दहावी उमेदवार यादी जाहीर, पण या खासदारांचे नाव नाही, धाकधूक वाढली

शिवाय, “एनडीएकडे आत्मविश्वास आहे, पण इंडियाकडे अहंकार आहे. आत्मविश्वास नेहमी आपल्याला विजयाच्या दिशेने नेतो. पण अहंकार विनाशाकडे नेतो. त्यामुळे प्रभू श्रीरामाने अहंकारी रावणाचा वध केला होता. त्यामुळे इंडिया आघाडीच्या अहंकारेची लंका देशाची जनता जाळून खाक करेल, असा विश्वास सर्वांना आहे. विरोधकांकडे ना निर्णय, ना निती, ना नियत आहे. विरोधकांचा अजेंडा ‘करप्शन फर्स्ट’ तर मोदींचा अजेंडा ‘नेशन फर्स्ट’, असे म्हणत विरोधकांवर टीकास्त्र सोडले.

“देशाच्या अर्थव्यवस्थेला नव्या उंचीवर घेऊन जाण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. देशाची अर्थव्यवस्था आधी अकराव्या नंबरवरून पाचव्या क्रमांकावर आणि पाचव्या क्रमांकावरून तिसऱ्या नंबरवरही आणले. रोटी, कपडा, मकान देणारे मोदी कुठे आणि भ्रष्टाचाराने बरबटलेले विरोधक कुठे..? एका आदिवासी महिलेला सर्वोच्च पदावर बसवण्याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाते. गरीब, शोषित, पीडित, महिला भगिनींना न्याय देण्याचा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात केला आहे. लोकं आता मतदानाची वाट पहात आहेत, त्यामुळे नागपूरमधून नितीन गडकरी आणि रामटेकमधून राजू पारवे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करायचे आहे”, असेही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.


हेही वाचा – NARENDRA MODI : मोदींचेच सरकार पुन्हा का? स्वतः पंतप्रधानांनीच सांगितले कारण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -