घरताज्या घडामोडीLok Sabha 2024 : विश्वासात घेऊन काम करा अन्यथा काँग्रेससारखी अवस्था होईल;...

Lok Sabha 2024 : विश्वासात घेऊन काम करा अन्यथा काँग्रेससारखी अवस्था होईल; भाजप नेत्याची पक्षावर नाराजी

Subscribe

सांगलीतील भाजप नेत्याने पक्षालाच खडेबोल सुनावले आहे. विश्वासात घेऊन काम नाही केले,तर काँग्रेसची जी अवस्था आहे, तशी भाजपाची व्हायला वेळ लागणार नाही, अशा शब्दात भाजपाचे माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी पक्षाला खडेबोल सुनावत घरचा आहेर दिला आहे.

Lok Sabha Election 2024, सांगली : लोकसभेच्या सांगली मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यावरून महाविकास आघाडीत काँग्रेस पक्ष नाराज झाला आहे. सांगलीत काँग्रेसच्या नेत्यांनी ही जागा आपल्याला मिळावी यासाठी पक्षश्रेष्टींची दिल्लीला जाऊन भेट घेतली. मात्र त्यानंतरदेखील ही जागा शिवसेनेकडे कायम आहे. पंरतू, सांगली लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीत वाद सुरू असला तरी, दुसरीकडे महायुतीतही या मतदारसंघावरून वाद सुरू आहे. विशेष म्हणजे सांगलीतील भाजप नेत्याने पक्षालाच खडेबोल सुनावले आहे. विश्वासात घेऊन काम नाही केले,तर काँग्रेसची जी अवस्था आहे, तशी भाजपाची व्हायला वेळ लागणार नाही, अशा शब्दात भाजपाचे माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी पक्षाला खडेबोल सुनावत घरचा आहेर दिला आहे. (Lok Sabha Election 2024 Sangli BJP Leader Prithviraj Deshmukh Slams Party)

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगलीतील पलूस येथे बूथ संम्मेलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात भाष्य करताना पृथ्वीराज देशमुख यांनी पक्षाला खडेबोल सुनावले. “लोकसभा निवडणुकीसाठी मी सुद्धा मागणी केली होती. पण आम्हाला बोलवून सांगायला हवे होते. या कारणासाठी तुम्हाला तिकीट देणार नाही. आम्हाला काहीच अडचण नव्हती आणि पक्षावर आमचा आजही राग नाही. पण विश्वासात घेऊन कुणी काम नाही केले तर, काँग्रेसची जशी अवस्था आहे तशी आपली व्हायला वेळ लागणार नाही”, अशा शब्दांत पृथ्वीराज देशमुख यांनी पक्षाला खडेबोल सुनावले.

- Advertisement -

हेही वाचा – LOK SABHA ELECTION 2024 : यंदाच्या लोकसभेत देशात होणार कौटुंबिक लढती; वाचा सविस्तर

याशिवाय, खासदार संजयकाका पाटील यांच्यावर पृथ्वीराज देशमुख यांनी निशाणा साधला. “पलूस मतदार संघात पक्षाचा कार्यक्रम करून,आमचा कार्यक्रम करून परत निवडणुकीला उभा राहणार आणि आम्ही पक्ष म्हणून मत देणार. आता परत पाच वर्ष तेच करणार असाल तर आम्हाला यावर गांभीर्याने विचार करावा लागेल, अशा शब्दांत खासदार संजयकाका पाटील यांच्यावर पृथ्वीराज देशमुख यांनी निशाणा साधला.

- Advertisement -

दरम्यान, सांगली लोकसभा मतदारसंघावरुन महाविकास आघाडीमध्ये गेल्या काही दिवसांपासून तणावाचं वातावरण आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाने सांगलीतून आधीच चंद्रहार पाटील यांच्या नावाची घोषणा केल्याने काँग्रेस नेते चांगलेच संतापले आहेत. काँग्रेसकडून इच्छुक असलेल्या विशाल पाटील यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. वरिष्ठांकडून या जागेबाबतचा निर्णय झाला असला तरी कार्यकर्ते आक्रमक झाले असून विशाल पाटील हे बंडखोरी करणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.


हेही वाचा – Thackeray vs Thackeray : बिनशर्त पाठिंब्याचे नाटक…, नाव न घेता उद्धव ठाकरेंचा भावाला टोला

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -