घरताज्या घडामोडीLok Sabha Election 2024 : मतदानाचा हक्क बजावल्यानंतर प्रतिभा धानोरकर भावूक; म्हणाल्या...

Lok Sabha Election 2024 : मतदानाचा हक्क बजावल्यानंतर प्रतिभा धानोरकर भावूक; म्हणाल्या…

Subscribe

महाराष्ट्रात आज (19 एप्रिल) पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात झाली आहे. सकाळी सकाळी 7 वाजता सुरु झालेले मतदान संध्याकाळी ६ वाजेपर्यंत चालणार आहे. पहिल्या टप्प्यात विदर्भातील रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर या मतदार संघात मतदान होणार आहे.

चंद्रपूर : महाराष्ट्रात आज (19 एप्रिल) पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात झाली आहे. सकाळी सकाळी 7 वाजता सुरु झालेले मतदान संध्याकाळी ६ वाजेपर्यंत चालणार आहे. पहिल्या टप्प्यात विदर्भातील रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर या मतदार संघात मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीतीस काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यानंतर त्या भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. (lok sabha election 2024 Pratibha Dhanorkar candidate of Mahavikas Aghadi of Chandrapur claimed the right to vote)

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर विरुद्ध महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार अशी लढत आहे. नुकताच प्रतिभा धानोरकर यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यानंतर प्रतिभा धानोरकरांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्या भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.

- Advertisement -

हेही वाचा – Lok Sabha 2024 Live Update : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात

नेमकं काय म्हणाल्या प्रतिभा धानोरकर?

“आज 19 एप्रिल महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्याचे मतदान आहे. माझ्यासाठी आजचा दिवस आनंदाचा असून दुख:चा सुद्धा आहे. कारण चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील लोकमान्य शाळेच्या बूतवर मी आणि दिवंगत खासदार बाळू धानोरकर जोडीने मतदान करण्यासाठी येत होते. पण आज त्यांची कमी क्षणोक्षणी जाणवत आहे. पण नशिबात असतं ते होतंच आणि आलेल्या सगळ्या अडचणींना सामोरं जात मी ही निवडणूक लढवत आहे. आज खऱ्या अर्थाने हा लोकशाहीचा उत्सव असून, या लोकशाहीच्या उत्सवात सर्वांना सामील होण्याचे आव्हान मी करत आहे”, असे प्रतिभा धानोरकर म्हणाल्या.

- Advertisement -

“आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला संविधान दिलं असून त्या संविधानामुळे आपल्याला मतदानाचा अधिकार दिला असून हा अधिकार आपण बजावला पाहिजे. तसेच, संविधानाचा आणि लोकशाहीचा सन्मान आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. मतदान करून लोकशाही जीवंत ठेवण्याचे काम आपण केलं पाहिजे. आज विदर्भात कडक आहे, तरीही मी मतदारांना आव्हान करते की आपण घराबाहेर पडून मतदान करा आपले मतदान वाया जावू देऊ नका. जेवढ्या जास्तीत जास्त पद्धतीने मतदान करता येईल. तेवढं मतदान करा”, असेही प्रतिभा धानोरकर म्हणाल्या.

दरम्यान, देशातील 102 जागांवर मतदान होणार असून त्यात महाराष्ट्रातील पाच जागा आहेत. तसेच, नक्षली भागासह संवेदनशील मतदारसंघांमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. 18 लाख कर्मचारी मतदानप्रक्रियेचा कारभार सांभाळणार आहेत. अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीमच्या विधानसभा मतदारसंघांसाठीही आज मतदान होणार आहे.


हेही वाचा – LOK SABHA 2024 : पहिल्या टप्प्यासाठी आज मतसंग्राम; दिग्गजांचे भविष्य मतदार ठरवणार

Edited By – Vaibhav Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -