घरताज्या घडामोडीSangli Lok Sabha : बंडखोरी झाली तर..., सांगलीतील वादावर उद्धव ठाकरेंचे स्पष्टीकरण

Sangli Lok Sabha : बंडखोरी झाली तर…, सांगलीतील वादावर उद्धव ठाकरेंचे स्पष्टीकरण

Subscribe

शिवसेना भवनात नुकताच शिवसेना ठाकरे गटप्रमुख उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचे नवीन गीत लॉन्च केले. तसेच, सांगली लोकसभा मतदारसंघात सुरू असलेल्या वादावर भाष्य केले.

मुंबई : जागावाटप झालेले आहे. जर कुठे बंडखोरी होत असेल तर, त्या-त्या पक्षाची जबाबदारी आहे. पण जरी बंडखोरी झाली तर, जनता त्यांना स्थान देईल असे वाटत नाही, म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगली लोकसभेतील वादावर आपलं मत स्पष्ट केले. (Lok Sabha Election 2024 Uddhav Thackeray Slams vishal patil in shiv sena press conference sangli lok sabha)

शिवसेना भवनात नुकताच शिवसेना ठाकरे गटप्रमुख उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचे नवीन गीत लॉन्च केले. तसेच, सांगली लोकसभा मतदारसंघात सुरू असलेल्या वादावर भाष्य केले. “जागावाटपानंतर जर कोणी बंडखोरी करत असतील निवडणूक लढवत असतील तर त्याचा फटका बसणार नाही. संपूर्ण देशात हुकूमशाही विरोधात एक जनमत तयार झाले असून ते फक्त मतदानाची वाट पाहत आहेत. त्यामुळे मी काही बोलणार नाही. कारण जागावाटप झालेला आहे. महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांनी आणि मित्र पक्षांनी एकत्रित येऊन पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये जागावाटप जाहीर केले. त्यानंतर आता जर कुठे बंडखोरी होत असेल तर, त्या-त्या पक्षाची जबाबदारी आहे. जर बंडखोरी झाली तर, जनता त्यांना स्थान देईल, असे वाटत नाही”, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी नाव न घेता विशाल पाटलांच्या भूमिकेवर टीका केली.

- Advertisement -

“ही लढाई हुकूमशाही विरुद्ध लोकशाही अशी होणार आहे. देश वाचविण्यासाठी एकत्र यावं असं आवाहन करतोय. आव्हान हुकूमशाहीला आणि आवाहन जनतेला असेल. माझे टार्गेट 48 आहे आणि आम्ही 48 जागा जिंकू”, असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : प्रचारासाठी उद्धव ठाकरेंकडून शिवसेनेचे नवीन गीत लॉन्च

- Advertisement -

शिवाय, “भाजप हा व्हॅक्युम क्लीनर झाला आहे. मोदी व्हॅक्युम क्लीनर इकडे-तिकडे फिरत आहे. प्राण जाये वचन ना जाये असं त्यांना कळलं असतं, तर अडीच अडीच वर्षे सरकार मान्य झालं असतं”, अशीही टीका उद्धव ठाकरेंनी यावेळी केली.

उद्धव ठाकरेंची पंतप्रधान मोदींवर टीका

राम मंदिर निर्माणामध्ये अगदी बाबरीपासून मोदींनी कधी सहभाग घेतला ते सांगा, असा सवाल उपस्थित करत उद्धव ठाकरेंनी पंतप्रदानांवर टीका केली. इलक्ट्रोल बॉण्ड प्रकरण सर्वोच्च न्यायालयाने समोर आणले आहे. जगताला सगळ्यात मोठा घोटाळा आहे. याला मोदी गेट असे नाव दिले आहे. आता विरोधकांना पच्छाताप होईल कारण हे प्रकरण आधी समोर का आलं नाही, असं म्हणत ठाकरेंनी विरोधकांवर निशाणा साधला.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत प्रचाराकरीता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मशाल गीत लॉन्च केले आहे. शिवसेने ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मशाल गीत लॉन्च केले आहे. शिवसेनेत फुट पडल्यानंतर शिवसेना नाव आणि पक्षचिन्ह धनुष्यबाण हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पदरी पडलं. त्यानंतर निवडणूक आयोगाकडून ठाकरे गटला मशाल हे निवडणूक चिन्ह आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पक्षनाव देण्यात आले. त्यामुळे यंदाच्या लोकसभेत मशाल चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मशाल गीत तयार केले असून त्याचा प्रचारादरम्यान वापरला जाणार आहे.


हेही वाचा – Lok Sabha 2024 : मोदी सरकार म्हणजे हुकूमशाहीची शंभर टक्के गॅरंटी, ठाकरे गटाचा घणाघात

Edited By – Vaibhav Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -