Maharashtra Corona Update : राज्यात ओमिक्रॉन बाधिकांची संख्या 62 वर; कोरोनाचे 973 नवे रुग्ण तर 12 रुग्णांचा मृत्यू

राज्यात आतापर्यंत 77 लाख 7 हजार 254 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे

maharashtra corona update 973 new corona patients and 12 death and 62 omicron patients reported in last 24 hrs in state
Maharashtra Corona Update : राज्यात ओमिक्रॉन बाधिकांची संख्या 62 वर; कोरोनाचे 973 नवे रुग्ण तर 12 रुग्णांचा मृत्यू

राज्यातील कोरोना संसर्ग दिवसेंदिवस आटोक्यात येत असून रुग्णसंख्या कमी होत आहे. विशेष म्हणजे कोरोना मृतांची संख्याही कमी झाली आहे. गेल्या 24 तासात राज्यात 973 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर 12 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. याशिवाय 2 हजार 521 रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. परंतु राज्यात आज ओमिक्रॉनबाधित रुग्णांच्या संख्येत कालच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्यात आज 62 नवे ओमिक्रॉनबाधित रुग्ण आढळले आहेत. विशेष म्हणजे 22 महानगपालिका क्षेत्रात कोरोनाचा एकही कोरोना रुग्णाचा मृत्यू झालेला नाही, तर तीन महापालिकांमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण सापडलेला नाही. राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या आज कमी झाली आहे. आज राज्यात एकूण 8 हजार 688 रुग्णांवर (सक्रिय रुग्ण) उपचार सुरु आहेत.

राज्यात आज 12 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद

राज्यात आतापर्यंत 77 लाख 7 हजार 254 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.01 टक्के आहे. सध्या राज्यात 1 लाख 47 हजार 800 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 746 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आजपर्यंत 7 कोटी 76 लाख 58 हजार 977 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.

राज्यात आजपर्यंत 78 लाख 63 हजार 623 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर आतापर्यंत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या 1 लाख 43 हजार 687 इतकी आहे. यात राज्यात आज 12 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे मृत्यूदर 1.82 टक्के झाला आहे. आजपर्यंत राज्यात एकूण 77 लाख 07 हजार 254 रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आज 98.01 टक्के झाले आहे.

आजपर्यंत कोरोनाच्या 7 कोटी 76 लाख 58 हजार 977 चाचण्यांपैकी 78 लाख 63 हजार 623 चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. हे प्रमाण 10.13 टक्के इतके आहे. सध्या राज्यात 1 लाख 47 हजार 800 व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत, तर 746 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

राज्यात आज 62 ओमायक्रॉनबाधितांची नोंद

राज्यात आज 62 ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली आहे. आतापर्यंत राज्यात 4629 ओमायक्रॉनबाधितांची नोंद  झाली आहे. त्यापैकी 4456 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे. आज नोंद झालेल्या 62 रुग्णांपैकी 60 रुग्ण पुणे महानगरपालिका क्षेत्रातील आहेत तर पुणे ग्रामीणमध्ये 2 रुग्णांची नोंद झाली आहे.


Mumbai Corona Update : मुंबईत आज 128 नवे कोरोनाबाधित रुग्ण, तर 200 रुग्ण कोरोनामुक्त