घरताज्या घडामोडीMaharashtra Corona Update : राज्यात २४ तासात ५३५ कोरोनाबाधितांची नोंद, १० रुग्णांचा...

Maharashtra Corona Update : राज्यात २४ तासात ५३५ कोरोनाबाधितांची नोंद, १० रुग्णांचा मृत्यू

Subscribe

राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाला आहे. नेहमीप्रमाणे नवीन कोरोनाबाधितांच्या संख्येपेक्षा कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. गेल्या २४ तासात ९६३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच ५३५ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. राज्यात आज १० कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८२ टक्के झाला आहे. राज्यातील कोरोनाबाधितांच्या मृत्यूसंख्येत चढ उतार पाहायला मिळत आहे.

राज्यातील कोरोना प्रादुर्भावामध्ये मोठ्या प्रमाणात घट झाला असल्यामुळे कोरोना निर्बंध शिथिल करण्यात आले आहे. तसेच ज्या राज्यांतील कोरोना पॉझिटिव्हिटी दर जास्त आहे. त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना निर्णय घेण्याची मुभा देण्यात आली आहे. दरम्यान राज्यात आज ५३५ कोरोनाबाधितांची नोंद झाली असून आतापर्यंत एकुण ७८,६८,४५१ रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या ४ हजार ३८ वर आली आहे. आजपर्यंत राज्यात एकूण १ लाख ४३ हजार ७३७ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

राज्यात गेल्या २४ तासात ४५४ ओमिक्रॉनबाधितांची नोंद

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून ओमिक्रॉनबाधितांची नोंद झाली नव्हती परंतु आज ४५४ ओमिक्रॉनबाधितांची नोंद झाली आहे. एकाच दिवसात ४५४ अहवाल ओमिक्रॉनबाधित आढळले आहेत. आजपर्यंत राज्यात ५६६५ ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत.

मुंबईत ६५ कोरोनाबाधितांची नोंद

मुंबईतील कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाली असून गेल्या २४ तासात ६५ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. दरम्यान २४ तासात ८९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईतील कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर आता ९८ टक्क्यांवर असून आतापर्यंत मुंबईत १ लाख ३६ हजार ७२३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

- Advertisement -


हेही वाचा : Rockstar Ravindra Jadeja : शेन वॉर्नच्या रॉकस्टारची मोहालीत धुव्वादार फलंदाजी, जडेजाची शतकीय खेळी

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -