घरमहाराष्ट्रअजित पवार कुठे हे चार दिवसांत कळेल; शिवसेना नेत्याच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात...

अजित पवार कुठे हे चार दिवसांत कळेल; शिवसेना नेत्याच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

Subscribe

चार दिवस थांबा अजित पवार कुठे असतील ते समजेल, शिवसेना ( शिंदे गट) नेते संजय शिरसाट यांनी हे सूचक वक्तव्य केलं आहे.

चार दिवस थांबा अजित पवार कुठे असतील ते समजेल, शिवसेना ( शिंदे गट) नेते संजय शिरसाट यांनी हे सूचक वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात मात्र चर्चांना उधाण आलं आहे. राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होणार असल्याच्या चर्चा मागच्या काही दिवसांपासून सातत्याने होत आहेत. अजित पवार भाजपात प्रवेश करतील अशा चर्चा होत्या. त्यानंतर अजित पवार यांनी स्वत: माध्यमांसमोर येत या सर्व अफवा असल्याचं सांगत या सर्व बातम्यांना पूर्णविराम दिला. त्यानंतर आता शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी लवकरच अजित पवार कुठे असतील ते समजेल, असं म्हटल्यानं पुन्हा एकदा चर्चांना वेग आला आहे. ( Maharashtra Politics  Shinde group leader Sanjay Shirsat said that soon will declared Ajit pawar on Which Side  )

शिरसाट नेमकं काय म्हणाले?

मुंबईत आज होणाऱ्या वज्रमूठ सभेवर प्रतिक्रिया देताना शिरसाट म्हणाले की, या सभेत अजित पवार यांना आज सगळ्यात जास्त त्रास होत असेल. त्यांना सभेत खुर्ची आहे की, नाही माहिती नाही. तसचे अजित पवार सभेत आले तर काय बोलणार माहित नाही. पण या सभेत अजित पवार शरीराने असतील मात्र मनापासू सभेत नसणार आहेत. ते मनातून कुठे असतील याबाबत 4 दिवसांत कळेल आणि सगळ्यांना दिसेल. अजित दादा सगळे विषय हसून खेळून टोलवत आहे. याचाच अर्थ त्यांच्या मनात काहीतरी आहे आणि ते निर्णय शंभर टक्के घेतील.

- Advertisement -

( हेही वाचा: हिंदुत्व नशेच्या व्यापारात अडकले; संजय राऊतांनी भाजप नेत्यांविरुद्ध केली चौकशीची मागणी )

वज्रमूठ सभेवरुन टीका

आज मुंबईत होणाऱ्या वज्रमूठ सभेवरुनदेखील शिरसाट यांनी महाविकास आघाडीसह ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. शिरसाट म्हणाले की, यापूर्वी सुद्धा त्या मैदानावर बाळासाहेबांनी सभा घेतल्या आहेत. त्या सभांसोबत आजच्या सभेची बरोबरी करता येणार नाही. तर तीन पक्ष एकत्र येऊन गर्दी करत आहेत आणि आम्ही सोबत आहोत हे दाखवण्याचा केविलवाणआ प्रयत्न करत आहेत. पण सभेमुळे महाराष्ट्र कोणाच्या मागे आहे ते कळत नाही. सभेमुळे वातावरण बदलते हा चुकीचा समज आहे. शिवसेनाप्रमुख म्हणायचे, गर्दी होते मग मतदान का मिळत नाही? त्यामुळे फार लक्ष द्यायची गरज नाही, असे शिरसाट म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -