घरताज्या घडामोडीसगळ्यांना सारखाच न्याय हवा, बरोबर ना मुख्यमंत्री साहेब?, मनसेचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

सगळ्यांना सारखाच न्याय हवा, बरोबर ना मुख्यमंत्री साहेब?, मनसेचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Subscribe

शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे निवासस्थान मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठण करणार असल्याचा इशारा खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी दिला आहे. राणांविरोधात शेकडो शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत. राणांच्या खारमधील घरासमोर शिवसैनिकांची घोषणाबाजी सुरु आहे. राणा दाम्पत्य आणि शिवसेनेतील वादादरम्यान आता मनसेकडूनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्यात आली आहे. तुमचा विरोध असल्यामुळे शेकडो शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत. भोंग्याला आमचा विरोध आहे तर आमचं कुठे चुकले असे म्हणत न्याय सर्वांना सारखाच हवा असा निशाणा मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री ठाकरेंवर लगावला आहे.

राज्यातील मशिदींच्या भोंग्यांविरोधात मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. मशिदींवरील भोंगे उतरवण्यात यावेत अन्यथा मनसेकडून मशिदींसमोर भोंगे लावून हनुमान चालिसा लावण्यात येईल असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे. यानंतर हनुमान चालिसावरुन राजकीय वातावरण तापलं आहे. मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठण करणार असल्याचा इशारा राणा दाम्पत्याने दिला आहे. शिवसैनिक आक्रमक झाले असून रस्त्यावर उतरले आहेत. याचा धागा पकड मनसेकडून शिवसेनेवर निशाणा साधण्यात आला आहे.

- Advertisement -

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर ट्विट करत टिका केली आहे. तुमच्या घरासमोर हनुमान चालीसा नको म्हणून तुमचा विरोध आहे. हजारो लोक रस्त्यावर जमवलीत काही हरकत नाही. आम्हाला पण आमच्या घरासमोर भोंगा नकोय. आम्ही काय चुकीचं बोलतोय?न्याय सगळ्यांना सारखाच हवा. बरोबर ना मुख्यमंत्री साहेब??? असा निशाणा संदीप देशपांडे यांनी साधला आहे. तसेच शिवसेना पूर्णपणे ट्रॅप मध्ये फसत चालली आहे,एका महिन्यात दोन खासदारांच्या घरावर हल्ला झाला आहे. स्वतःहून राष्ट्रपती राजवटीचा मार्ग तयार करत आहेत असा आरोप मनसेकडून करण्यात आला आहे.

- Advertisement -

रवी राणांच्या घराखाली शिवसैनिकांची घोषणाबाजी

मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठण करणार असा इशारा राणा दाम्पत्याने दिला आहे. राणा दाम्पत्याला विरोध करण्यासाठी आणि घरातून बाहेर पडू न देण्यासाठी खारमध्ये शिवसैनिकांनी गर्दी केली आहे. राणा यांच्या खारमधील घरासमोर शिवसैनिक जमले असून घोषणाबाजी सुरु आहे. महिला कार्यकर्त्यांनी येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांची तपासणी केली आहे. राणा दाम्पत्य कोणत्या गाडीतून जाऊ नये यासाठी सर्व गाड्या तपासण्यात आल्या तसेच राणांच्या घराबाहेर त्यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली आहे.


हेही वाचा : ॲक्शनला आम्ही रिॲक्शन देऊ शकतो, आमचे हात बांधले नाही, दरेकरांचा शिवसेनेला स्पष्ट इशारा

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -