घर ताज्या घडामोडी Sanjay Raut : मोदी सरकारची नऊ वर्षं देशाला नाकीनऊ आणणारी, राऊतांची टीका

Sanjay Raut : मोदी सरकारची नऊ वर्षं देशाला नाकीनऊ आणणारी, राऊतांची टीका

Subscribe

मोदी सरकारला (Modi Government) सत्तेत येऊन नऊ वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यामुळे मोदी सरकारने (PM Modi) आणि विशेषतः भाजपने जनसंपर्क अभियान राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार संपूर्ण महाराष्ट्रात हे अभियान राबवले जात आहे. दरम्यान, भाजपला नऊ वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.

मोदी सरकारची नऊ वर्ष देशाला नाकीनऊ आणणारी

संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर निशाणा साधला आहे. भाजपला नऊ वर्ष पूर्ण झालेत. ही नऊ वर्ष देशाला नाकीनऊ आणणारी आहेत. या ९ वर्षांत अनेक प्रश्नांनी देशाला नाकीनऊ आणलं आहे. मोदींमुळे जगात देशाचा सन्मान वाढला. मग २०१४ च्या आधी लोकांना हा देश माहिती नव्हता का?, पंडीत नेहरू, मनमोहन सिंग यांच्यापासून प्रत्येकाने या देशाची मान जगात उंच केली आहे. असं काय नवीन घडलंय की, या ९ वर्षात देशाचा मान-सन्मान वाढला. हे त्यांनी स्पष्ट करून सांगावं, असं म्हणत खासदार संजय राऊतांनी भाजपवर टीका केली.

बाळू धानोरकर यांच्या निधनाचा मोठा धक्का

- Advertisement -

बाळू धानोरकर यांच्या निधनाचा धक्का हा फक्त काँग्रेसला नाही तर शिवसेनेला सुद्धा तितकाच मोठा धक्का आहे. बाळू धानोरकर हे आमच्या सर्वांचे एकेकाळी मित्र आणि सहकारी होते. आज मी सकाळी दिल्लीला पोहोचणार होतो. कारण धानोरकरांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात जायचं होतं. पण मी सकाळी मुंबईच्या विमानतळावर पोहोचलो आणि मला समजलं की, त्यांचं निधन झालंय. बाळू धानोरकर हे मुळचे शिवसैनिक होते. शाखाप्रमुख पदापासून, तालुकाप्रमुख, जिल्हाप्रमुख एकदा विधानसभा लढले. तसेच त्यांचा थोडक्यात पराभव झाला. त्यानंतर परत त्यांनी विजय प्राप्त केला. त्यांना शिवसेनेकडून लोकसभा लढवायची होती. त्यासाठी ठाकरेंनी देखील तयारी करण्याची परवानगी दिली होती. पण त्यांना शिवसेनेकडून लढता आलं नाही. त्यामुळे ऐनवेळी ते शिवसेनेतून काँग्रेसमध्ये गेले आणि लोकसभा निवडणूक लढले. ते काँग्रेस पक्षाचे एकमेव खासदार होते. शिवसैनिक असण्याचा सार्थ अभिमान त्यांना होता, असं संजय राऊत म्हणाले.

हेही वाचा : Sanjay Raut : आता कोणत्या पक्षात जाणार? कीर्तिकरांना राऊतांचा सवाल

फडणवीसांची इच्छा झाली असेल म्हणून…

- Advertisement -

राज ठाकरे हे उत्तम वक्ता आहेत. ते लोकांचं स्वागत चांगलं करातात. फडणवीसांची इच्छा झाली असेल म्हणून ते गेले असतील. अजून काही लोकांना त्यांच्यासोबत राहायची इच्छा असेल तर त्यांनी जावं आणि तिथे ८ दिवस राहावं. कोण-कोणाकडे गेल्यामुळे शिवसेनेचं भविष्य मार्गी लागत नाही. शिवसेना शिवसेनेच्या जागेवर आहे, असंही राऊत म्हणाले.

भाजपाचा खरा चेहरा समजलाय – नाना पटोले

भाजपा सातत्याने मतविभाजनाचे राजकारण करत असून आधीही मतविभाजनाचे राजकारण करत होती. त्यामुळे मतविभाजन (Division Of Vote) कसे होईल आणि त्यांना कसे सेफ केले जाईल, हा भाजपाचा (BJP) प्रयत्न असतो. त्यामुळे त्यावर फार काही बोलण्याची गरज नाही. लोकांना आता भाजपाचा खरा चेहरा समजलेला आहे. नऊ वर्षांत त्यांनी देश लुटले. देशाची मालमत्ता भाजपाने विकली. देशाच्या जनतेला जीएसटीसारखा (GST) सुलतानी कायदा आणून सर्वसामान्यांना लुटलं कसं? याबाबत त्यांनी व्याख्यान मांडलं असते तर बरे झाले असते. वस्तुस्थितीही लोकांच्या समोर आली असती, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी भाजपावर केली.


- Advertisment -