घरमहाराष्ट्रनारायण राणे यांच्या बंगल्याची पाहणी न करताच पालिका पथक माघारी

नारायण राणे यांच्या बंगल्याची पाहणी न करताच पालिका पथक माघारी

Subscribe

शिवसेना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुटुंबीय केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. राणे यांच्या जुहू येथील बंगल्याला पालिकेने गुरुवारी नोटीस पाठवली होती ; मात्र अनधिकृत बांधकाम तपासणीसाठी व कारवाईसाठी गेलेले पालिकेचे पथक अवघ्या १० मिनिटातच माघारी परतल्याने चर्चेला उधाण आले आहे. मात्र पालिकेचे पथक राणेंच्या बंगल्यावर पोहोचल्यानंतर नारायण राणे यांनी ट्विट करून सुशांत सिंह, दिशा सालीयन प्रकरणाची फाईल ओपन करण्याचा व मातोश्रीवरील चौघांसाठी ईडीची नोटीस तयार असल्याचा इशारा दिल्यानेच पालिकेचे पथक कोणतीही कारवाई न करता माघारी परतल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे नारायण राणे हे घरात नसल्याचे कारण दिले जात आहे.

त्यामुळे आता राणे विरोधात शिवसेना, ठाकरे या प्रकरणाला आणखीन हवा मिळत असल्याने दोन्ही बाजूने पेटलेली आग व त्यातील निखारे मांडवली होऊन विझतील की त्यावर आणखीन कोणत्या ज्वलनशील इंधनाचा ( प्रकरणाचा) मारा होऊन आग भडकते ते पुढील काही तासात समोर येणार आहे. दरम्यान, पालिका पथक सोमवारी पुन्हा एकदा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या बंगल्यावर धडकणार असल्याचे पालिका सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

- Advertisement -

राज्यात विशेषतः मुंबईत शिवसेना व भाजप यांच्यातील वाद पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चिघळत चालला आहे. दोन्हीकडून आरोप – प्रत्यारोप होत आहेत. एकमेकांवर कुरघोडी करण्याचे, डिवचण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यातीलच एक प्रकार म्हणजे शिवसेना व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. राणे यांच्या जुहू येथील बंगल्याला अनधिकृत बांधकाम तपासणीसाठी नोटीस पाठवून आज पाहणी व कारवाईसाठी गेलेले पालिकेचे पथक अवघ्या १० मिनिटातच माघारी परतले.

वास्तविक, भाजप नेते व माजी खासदार किरीट सोमय्या आणि शिवसेना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील प्रकरण चिघळल्याने आणि या वादात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी, उडी घेतल्याने ते शिवसेनेच्या, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या रडारवर आले. दोन दिवस मंत्री नारायण राणे व शिवसेना यांच्यात वादविवाद सुरू आहे. त्यानंतर पालिकेने गुरुवारी मंत्री नारायण राणे यांना, जुहू येथील बंगल्यात अनधिकृत बांधकाम, काही फेरफार, बदल केल्याचा ठपका ठेवून एक नोटीस पाठवली होती. शुक्रवारी पालिकेचे पथक जुहू येथील मंत्री नारायण राणे यांच्या बंगल्याची पाहणी करण्यासाठी येणार असल्याचे कळविण्यात आले होते.

- Advertisement -

त्यानुसार, पालिकेचे एक पथक शुक्रवारी सायंकाळी ५.१० वाजताच्या सुमारास राणे यांच्या बंगल्यात शिरले. त्यांनी बऱ्याच ठिकाणी पाहणीही केली. मात्र अवघ्या १० मिनिटात पालिकेचे पथक कारवाई न करता माघारी परतले. त्यामुळे मंत्री नारायण राणे व संपूर्ण राणे कुटुंबियांना तात्पुरता तरी मोठा दिलासा मिळाला आहे. तर मंत्री राणे व त्यांच्या कुटुंबियांवरील मोठे संकट आता सोमवारवर गेले आहे. दरम्यान, मंत्री राणे यांनी, यांनी ट्विट करून सुशांत सिंह, दिशा सालीयन प्रकरणाची फाईल ओपन करण्याचा व मातोश्रीवरील चौघांसाठी ईडीची नोटीस तयार असल्याचा इशारा दिल्यानेच पालिकेचे पथक कोणतीही कारवाई न करता माघारी परतल्याचे बोलले जात आहे.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -