घरताज्या घडामोडी'दिस इज यू, दिस इज मी...' दुचाकीस्वारांच्या सुरक्षेसाठी मुंबई पोलिसांचे नवे रील...

‘दिस इज यू, दिस इज मी…’ दुचाकीस्वारांच्या सुरक्षेसाठी मुंबई पोलिसांचे नवे रील व्हायरल

Subscribe

मुंबईत (Mumbai) अनेकदा दुचाकीचालक वारंवार वाहतूक पोलिसांनी सुचना देऊनही नियमांचे (Traffic Rules) पालन करत नाहीत. नियम न पाळल्याने आणि पोलिसांच्या निदर्शास आल्यास संबंधित दुचाकी चालकाला दंडात्मक कारावाईला सामोरे जावे लागते.

मुंबईत (Mumbai) अनेकदा दुचाकीचालक वारंवार वाहतूक पोलिसांनी सुचना देऊनही नियमांचे (Traffic Rules) पालन करत नाहीत. नियम न पाळल्याने आणि पोलिसांच्या निदर्शास आल्यास संबंधित दुचाकी चालकाला दंडात्मक कारावाईला सामोरे जावे लागते. मात्र, मुंबईकरांनी वाहन चालवताना सुरक्षेची काळजी घ्यावी यासाठी मुंबई पोलीस (Mumbai Police) विविध माध्यमातून जनजागृती करत असतात. अशातच आता मुंबई पोलिसांनी त्यांच्या इंस्टाग्रामच्या (Instagram) अकाउंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये दुचाकी चालाकांनी हेल्मेटचा वापर करावे असे दाखवण्यात आले आहे.

मुंबईत वाहतुकीसंदर्भात एक नियम जारी करण्यात आला आहे. या नियमानुसार आता दुचाकीवर बसणाऱ्या दोन्ही प्रवाशांना हेल्मेट घालणे सक्तीचे केले आहे. या नियमाचे पालन मुंबईकरांनी सक्तीने करावे यासाठी सध्या इन्स्टाग्रामवर ट्रेंडिंग असलेल्या ‘दिस इज यु, दिस इज मी, दिस इज ऑल व्ही नीड’ या गाण्यावरील रीलच्या माध्यमातून त्यांनी जनजागृती करणारे रील शेअर केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mumbai Police (@mumbaipolice)

- Advertisement -

या रिलच्या माध्यमातून मुंबई पोलिसांनी नेटकऱ्यांना हेल्मेट संबंधीच्या नव्या नियमाची आठवण करून दिली आहे. मुंबई पोलिसांच्या या रीलला शेअर केल्यानंतर काही तासांतच जवळपास ३५ हजारांहून लाईक्स मिळाले आहेत. तसेच, नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हेही वाचा – हेल्मेट घातले असतानाही कापले जाणार 2000 रुपयांचे चलान; जाणून घ्या नवा वाहतुकीचा नियम

- Advertisement -

मुंबई पोलिसांच्या सोशल मीडिया अकाउंटवर आपल्याला नेहमी काही ना काही नवीन आणि रंजक गोष्टी पाहायला मिळतात. त्यांच्या अकाउंटवर फक्त मजेशीर गोष्टीच शेअर केल्या जात नाहीत, तर त्यामधून सामाजिक संदेश देखील दिला जातो.

दोघांनाही हेल्मेट घालणे बंधनकारक

दुचाकीस्वार आणि मागे बसणाऱ्या व्यक्तीला पुढच्या 15 दिवसात हेल्मेट वापरणे बंधनकारक असेल. त्यामुळे आता दुचाकी चालवताना दोघांनाही हेल्मेट घालणे बंधनकारक असणार आहे. वाहतूक विभागाकडून (Traffic Department) पुढील 15 दिवसांत या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. तसेच, नियम न पाळणाऱ्यांना कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल. दुचाकीलस्वार आणि त्याच्या पाठीमागे बसलेल्या व्यक्ती यांनी दुचाकी चालवताना हेल्मेट वापरणे वाहन कायदा 1988 कलम 129 सह 194 (ड) अन्वये बंधनकारक आहे. विना हेल्मेट मोटारसायकल चालविल्यास मोटार वाहन कायद्यामध्ये 500 रुपये दंड तसेच 3 महिन्यांसाठी लायसन्स निलंबित करण्याची तरतूद करण्यात आली आहे.


हेही वाचा – राज्यसभा निवडणुकीत शरद पवार १९९८ ची पुर्नरावृत्ती करणार का?, पवारांनी दाखवला होता काँग्रेसच्या उमेदवाराला कात्रजचा घाट

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -