घरताज्या घडामोडीराष्ट्रवादीच्या अमोल मिटकरींनी सांगितला भाजपाचा 'छुपा अजेंडा'; वाचा नेमके प्रकरण काय?

राष्ट्रवादीच्या अमोल मिटकरींनी सांगितला भाजपाचा ‘छुपा अजेंडा’; वाचा नेमके प्रकरण काय?

Subscribe

राज्यातील महापुरुषांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात संपूर्ण राज्यभरात आंदोलन करण्यात आले. त्यानंतर त्यांच्यावर शाईफेकही करण्यात आली. दरम्यान, चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक केल्याप्रकरणी त्यांच्या समर्थकांनीही आंदोलन केले.

राज्यातील महापुरुषांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात संपूर्ण राज्यभरात आंदोलन करण्यात आले. त्यानंतर त्यांच्यावर शाईफेकही करण्यात आली. दरम्यान, चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक केल्याप्रकरणी त्यांच्या समर्थकांनीही आंदोलन केले. मात्र, त्यांच्या आदोनातील एक फोटो राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विटर शेअर करत हा आहे भाजप व RSS चा छुपा अजेंडा, असे म्हटले आहे.

मंत्री चंद्रकांत पाटील यांनी फुले, आंबेडकर, कर्मवीरांनी शाळा काढण्यासाठी भीक मागितली होती, असे विधान शुक्रवारी पैठण येथे केले होते. चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्यानंतर सर्वच स्तरातून त्यांच्यावर टीका झाली. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसने पाटलांच्या कोथरुड मतदारसंघात आंदोलनही झाले.

- Advertisement -

दरम्यान, आपल्या वक्तव्याबाबत चंद्रकांत पाटील यांनी दिलगिरीही व्यक्त केली. मी मूकभाषा शिकणार आहे. मला मदत करा, असे आवाहन त्यांनी केले. पत्रकारांनी माझे वक्तव्य सर्वांपर्यंत पोहोचवले. त्यामुळे त्यांचे आभार. तसेच माझ्यावर टीका करणारे विरोधक हे तोंडघशी पडले आहेत. अनेक दलित संघटना मी चुकीचे बोललो नाही, अशी पत्रके काढत आहेत, असा दावाही पाटील यांनी केला. त्यामुळे हा वाद मिटण्याची चिन्हे होती. मात्र औरंगाबाद येथे चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकण्याचा प्रयत्न झाला. परिणामी हा वाद अजून चिघळला.

चंद्रकांत पाटलांवर शाईफेक केल्यानंतर त्यांच्या समर्थनात आंदोलनही करण्यात आले. अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात आली. त्यावेळी एका आंदोलनात आंदोलकांनी हाती घेतलेल्या पोस्टरमध्ये “भारत भूमीते तीन शिल्पकार फुले, आंबेडकर, हेगडेवार”, असे लिहिले होते. हाच फोटो राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. तसेच, त्याला “हा आहे भाजप व RSS चा छुपा अजेंडा….”, असे कॅप्शन दिले.

- Advertisement -

कोण आहेत ‘हेगडेवार’?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना 1925 साली झाली. या संघटनेचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार होते. डॉ. केशव बळीरामपंत हेडगेवार यांनी 27 सप्टेंबर 1925 रोजी दसऱ्याच्‍या मुर्हतावर त्यांच्या ‘शुक्रवारी’ परिसरातील नागपूर येथील निवासस्थानी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. आजही संघाचे मुख्‍यालय नागपूर येथेच आहे.

राष्ट्रीय सेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्‍था आहे. एवढेच नाही तर भाजपचे अनेक मोठे नेते हे संघाचे स्‍वयंसेवक राहिलेले आहेत. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही समावेश आहे. संघाच्‍या पहिल्‍या शाखेत केवळ 5 व्‍यक्‍ती सहभागी होत्‍या. आज देशभरात 50 हजारांपेक्षा अधिक शाखा आहेत आणि त्‍यात 90 लाख स्वयंसेवक म्‍हणून काम करतात. आरएसएस सदस्याचे ना रजिस्ट्रेशन होते ना त्याबाबत काही आयडी कार्ड या बिजनेस कार्ड दिले जाते. देशातील कोणताही नागरिक यात येऊ शकतो व कधीही बाहेर जाऊ शकतो. मात्र, मुली, महिलांना प्रवेश दिला जात नाही.


हेही वाचा – चीनने पुन्हा कुरापत काढली तर सडेतोड उत्तर मिळेल; संरक्षण मंत्र्यांची संसदेत ग्वाही

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -