घरताज्या घडामोडीमाझी शिवसेना पक्षाच्या घटनेवर पूर्ण निष्ठा आणि श्रद्धा, शिवसेनेकडून एकनिष्ठतेचे प्रतिज्ञापत्र

माझी शिवसेना पक्षाच्या घटनेवर पूर्ण निष्ठा आणि श्रद्धा, शिवसेनेकडून एकनिष्ठतेचे प्रतिज्ञापत्र

Subscribe

एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे प्रचंड मोठा हादरा बसलेल्या शिवसेनेने आता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून एकनिष्ठतेचे प्रतिज्ञापत्र भरून घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी आमदारांपासून ते उपशाखाप्रमुखांपर्यंत स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येत असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर आमचा विश्वास असल्याचे प्रतिज्ञापत्र पदाधिकाऱ्यांकडून घेण्यात येत आहे.

शिंदे यांनी ३८ आमदार फोडल्याने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे रातोरात सरकार कोसळले. त्यामुळे शिवसेनेने आता संघटनात्मक बांधणीवर भर दिला आहे. शिवसैनिक पक्षाशी कटिबद्ध असावेत म्हणून उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर विश्वास असल्याचे प्रतिज्ञापत्र शिवसैनिकांकडून लिहून घेतले जात आहे.

- Advertisement -

माझी शिवसेना पक्षाच्या घटनेवर पूर्ण निष्ठा आणि श्रद्धा आहे. तसेच वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी घालून दिलेले आदर्श आणि तत्त्वांवर अढळ निष्ठा आहे. आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर अढळ विश्वास आहे. त्यांना माझा बिनशर्त पाठिंबा आहे. उद्धव ठाकरे यांच्याप्रती मी पूर्ण निष्ठा व्यक्त करीत आहे आणि या निष्ठेची पुनश्च पुष्टी करीत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या घटनेत नमूद केलेली उद्दिष्टये पूर्ण करण्यासाठी मी सदैव कायर्रत राहीन अशी ग्वाही देतो, असे या प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आल्याचे कळते.


हेही वाचा : ११ दिवसानंतर शिंदे गटाचे आमदार मुंबईत

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -