घरमहाराष्ट्रमाणूसपण मान्य नसणाऱ्यांचा व्यवस्थेवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न, प्रकाश आंबेडकरांचा रोख कोणावर?

माणूसपण मान्य नसणाऱ्यांचा व्यवस्थेवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न, प्रकाश आंबेडकरांचा रोख कोणावर?

Subscribe

मुंबई – डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा आज ६६ वा महापरिनिर्वाण दिन आहे. त्यानिमित्ताने लाखोंचा भीमसागर आज चैत्यभूमीवर उसळणार आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर यांनीही चैत्यभूमीवर जाऊन अभिवादन केले. यावेळी त्यांनी भीम अनुयायांना महत्त्वाचं आवाहन करत व्यवस्थविरोधातही आवाज उठवला आहे.

हेही वाचा – महामानवाला अभिवादन! चैत्यभूमीवर उसळला जनसागर, दर्शनासाठी रीघ

- Advertisement -

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अनंत त्याग आणि कष्टातून इथल्या माणसाला माणूसपण मिळवून दिले. हे माणूसपण मान्य नसणारे पुन्हा व्यवस्थेवर ताबा मिळवू पाहत आहेत. त्यांचे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी आपले आणि आपल्या येणाऱ्या पिढ्यांचे माणूसपण ते हिरावू पाहतायत. आपली संघटित शक्तीच, या आव्हानाला उत्तर देऊ शकते. त्यामुळे प्रत्येकाने आपापली जबाबदारी ओळखून संघटनेने राहण्याचा संकल्प करूया. महामानवाच्या स्मृतीला हीच खरी मानवंदना. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनी त्यांना कोटी कोटी प्रणाम, विनम्र आदरांजली, असं ट्विट प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.

- Advertisement -

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज ६६ वा महापरिनिर्वाण दिन आहे. यानिमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी मुंबईत देशाच्या कानाकोपऱ्यातून हजारोंच्या संख्येने भीम अनुयायी मुंबईत दाखल झाले आहेत. पहाटेपासून भीम अनुयायांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी गर्दी केली आहे. त्यामुळे दिवसभरात आज चैत्यभूमीवर ओघ राहिलच.

महापालिकेतर्फे उपलब्ध विविध सेवासुविधा

  • चैत्‍यभूमी येथे शामियाना व व्‍ही.आय.पी. कक्षासह नियंत्रण कक्ष, चैत्‍यभूमी प्रवेशद्वाराजवळ व सूर्यवंशी सभागृह मार्ग या ३ ठिकाणी रुग्‍णवाहिकेसहीत आरोग्‍यसेवा.
  • १ लाख चौरस फूट क्षेत्रफळाच्‍या मंडपात तात्‍पुरता निवारा.
  • शिवाजी पार्क परिसरात पुरेशा संख्येतील फ‍िरती शौचालये.
  • पिण्‍याच्‍या पाण्‍याच्‍या नळांची व्‍यवस्‍था.
  • टँकर्संचीही व्यवस्था.
  • संपूर्ण परिसरात विद्युत व्‍यवस्‍था.
  • अग्निशमन दलामार्फत आवश्‍यक ती सेवा.
  • चौपाटीवर सुरक्षारक्षकासहीत बोटीची संपूर्ण परिसरात व्‍यवस्‍था.
  • मोठ्या पडद्यांवर थेट प्रक्षेपण.
  • फेसबुक, व्टीटर, यूट्यूब या समाजमाध्यमांवर पालिकेच्या अधिकृत खात्यांद्वारे ६ डिसेंबर रोजी थेट प्रक्षेपण
  • विचारप्रवर्तक पुस्तकांसह वैविध्यपूर्ण बाबींच्या विक्रीसाठी स्‍टॉल्‍स्ची रचना.
  • दादर (पश्चिम) रेल्‍वे स्‍थानकाजवळ आणि एफ उत्तर, चैत्‍यभूमी व छत्रपती शिवाजी महाराज मैदान, दादर (पूर्व) स्‍वामिनारायण मंदिराजवळ नियंत्रण कक्ष व माहिती कक्ष.
  • राजगृह येथे नियंत्रण कक्ष आणि वैद्यकीय कक्ष.
  • स्काऊट गाईड हॉल येथे भिक्‍कू निवासाची व्‍यवस्‍था.
  • मैदानात धुळीचा त्रास रोखण्‍यासाठी पायवाटांवर आच्छादनाची व्‍यवस्‍था.
  • अनुयायांना मार्गदर्शनाकरीता १०० फूट उंचीचे चैत्‍यभूमी परिसर येथे निदर्शक फुग्‍याची व्‍यवस्‍था.
  • भ्रमणध्वनी चार्जिंगकरीता शिवाजी पार्क येथे पॉइंटची व्‍यवस्‍था.
  • फायबरच्‍या तात्‍पुरत्‍या स्‍नानगृहाची व्‍यवस्‍था.
  • रांगेतील अनुयायांसाठी तात्‍पुरते छत असलेल्‍या बाकड्यांची व्‍यवस्‍था.
  • शिवाजी पार्क व्‍यतिरिक्‍त डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, वडाळा आणि लोकमान्‍य टिळक टर्मिनस (कुर्ला टर्मिनस) येथे देखील तात्‍पुरत्‍या निवा-यांसह पुरेशा संख्येने फि‍रती शौचालये
Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -