घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिक-मुंबई महामार्गावर शिंदे-ठाकरे गटात राडा

नाशिक-मुंबई महामार्गावर शिंदे-ठाकरे गटात राडा

Subscribe

नाशिक : राज्यभराचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे लक्ष मुंबईत होणार्‍या दोन्ही दसरा मेळाव्यांकडे लागले आहे. राज्यभरातून दोन्ही गटाचे शिवसैनिक विविध वाहनाच्या माध्यमातून मुंबईत दाखल होत आहेत. नाशिक-मुंबई महामार्गाने दोन्ही गटाचं९इये असंख्य वाहने प्रवास करत आहे. याचदरम्यान दोन्ही गटांमध्ये राडा झाला आहे. नाशिक-मुंबई महामार्गावर खर्डी गावानजीक ही घटना घडली आहे. नाशिकहून ठाकरे गटाच्या महिला आघाडीच्या पदाधिकार्‍यांना घेऊन जाणारी बस मार्गस्थ झालेली असताना. शिंदे गटाचे कार्यकर्ते असलेल्या बोलेरो गाडीतील काहींनी त्या बसकडे बघून काही अश्लील शब्द उच्चारले तसेच हावभाव केले. असा आरोप ठाकरे गटाच्या महिला पदाधिकार्‍यांनी केला आहे. यानंतर ठाकरे गटाच्या वाहनाने शिंदे गटाची बोलेरो अडवली आणि त्यातील दोन कार्यकर्त्यांना मारहाण केली. यामुळे नाशिक-मुंबई महामार्गावर काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती.

शिवसेनेत अभूतपूर्व असे बंड होऊन शिवसेना दोन गटात दुभंगली आहे. आणि आता या दोन्ही गटातील संघर्ष शिगेला पोहचला आहे. दसरा मेळाव्याच्या निमित्ताने दोन्ही गटांमध्ये ईर्षा निर्माण झाली आहे. दोन्ही बाजूच्या नेत्यांकडूनही मोठ्या प्रमाणात आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. त्याचीच परिणीती आता कार्यकर्त्यांच्या संघर्षात दिसून येत आहे. दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये कोणताही वाद होऊ नये, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिस प्रशासनाकडून मुंबई मध्ये जरी पूर्ण काळजी घेतली जात असली तरी आता दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये महामार्गावर राडा होताना दिसतोय.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -