घरमहाराष्ट्रRahul Gandhi : देशात कौशल्य आणि दलाल यांच्यात संघर्ष, धारावीत राहुल गांधींचे...

Rahul Gandhi : देशात कौशल्य आणि दलाल यांच्यात संघर्ष, धारावीत राहुल गांधींचे मोदींवर टीकास्त्र

Subscribe

मुंबई : धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानी समूहाकडे देण्यात आला आहे. यावरून काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आज, शनिवारी टीकास्त्र सोडले. देशात कौशल्य आणि दलाल यांच्यात संघर्ष सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा – LokSabha 2024 : लोकशाही वाचवण्याची ही अखेरची संधी; निवडणुका जाहीर झाल्यावर काय म्हणाले खर्गे ?

- Advertisement -

मणिपूर येथून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो न्याय यात्रेला सुरुवात केली होती. या यात्रेचा समारोप त्यांनी मुंबईच्या दादर येथील चैत्यभूमीवर केला. तत्पूर्वी, भारत जोडो न्याय यात्रेने ठाण्यातून मुंबईत प्रवेश केल्यानंतर राहुल गांधी यांची धारावीत सभा झाली. त्यात त्यांनी मोदी सरकारवर टीका केली. धारावीच्या पुनर्विकास अदानी समूहाकडे देण्यास महाविकास आघाडीने विरोध केला आहे. याच पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांच्या आज होणाऱ्या सभेतही याच मुद्द्यावरून भाजपा आणि नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले जाईल, असे अपेक्षित होते. त्यानुसार राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले.

- Advertisement -

धारावी म्हणजे कौशल्याचे केंद्र असून हेच खरे ‘मेक इन इंडिया’ आहे. धारावीतील कौशल्याला आर्थिक पाठबळाची गरज आहे. त्यामुळे बँकांचे दरवाजे तुमच्यासाठी खुले व्हायला पाहिजेत. तुमच्यासारखे कुशल व्यक्ती देश उभा करतात, असे सांगून राहुल गांधी म्हणाले, धारावी ही तुमची आहे आणि ती तुमचीच राहायला हवी. देशात कौशल्य आणि दलाल यांच्यात संघर्ष आहे. धारावी आणि अदानी यांच्यात संघर्ष आहे. देशातील काही अब्जाधिशांची कर्जे माफ केली जात आहेत आणि दुसरीकडे तुमची लूट सुरू आहे. त्यामुळेच आम्ही तुम्हाला सांगत आहोत की, जागे व्हा.

हेही वाचा – ECI : दुश्मनी जम कर करो लेकिन ये गुंजाइश रहे…, निवडणूक आयोगाच्या राजकीय पक्षांना कानपिचक्या

आम्ही सत्तेत आल्यानंतर जातनिहाय जनगणना करणार आहोत. कोणत्या जातीचे किती नागरिक आहे, हे त्यातून स्पष्ट होईल. त्यानंतर आम्ही आर्थिक सर्वेक्षण आणि संस्थांचे सर्वेक्षण करणार आहोत. याशिवाय, देशातील गरीब महिलांना वर्षाला एक लाख रुपयांची मदत देणार आहोत, याचा पुनरुच्चार त्यांनी केला. तर, इलेक्टोरल बॉण्डचा उल्लेख करत राहुल गांधी यांनी भाजपावर शरसंधान केले. मोदी सरकार जगातील सर्वात मोठे वसुली रॅकेट चालवत आहे. छापेमारी करून देणग्या घ्या, देणग्या देऊन कंत्राटे घ्या आणि हप्तावसुली या तीन मार्गांनी त्यांचा भ्रष्टाचार सुरू असल्याचा आऱोप त्यांनी केला.

हेही वाचा – Sanjay Raut : पारदर्शक निवडणुकांची गॅरंटी कोण देणार? संजय राऊतांचा सवाल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -