घरताज्या घडामोडीराज ठाकरेंच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली, मनसेच्या पदाधिकाऱ्यांची आज महत्त्वाची बैठक

राज ठाकरेंच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली, मनसेच्या पदाधिकाऱ्यांची आज महत्त्वाची बैठक

Subscribe

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानाबाहेर पोलीस सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. मशिदींवरील भोंगे उतरवा नाहीतर दुप्पट पटीने मशिदींसमोर लाऊडस्पीकरवर हनुमान चालिसा लावू, असा इशारा राज ठाकरे यांनी आपल्या जाहीर सभेतून दिला आहे. ४ मे पासून मनसेच्या आंदोलनाला सुरूवात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परंतु आज रमजान ईद असल्यामुळे आणि औरंगाबादच्या सभेत राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, यामुळे राज ठाकरेंच्या घराबाहेरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

देशभरात ईदचा सण आज साजरा केला जात आहे. राज्यात सुरू असलेल्या लाऊडस्पीकरच्या वादाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मुस्लिम समाजातील लोक आज सकाळपासूनच मशिदींमध्ये आणि रस्त्यावर नमाज अदा करण्यासाठी मोठ्या संख्येने पोहोचत आहेत. मात्र, मशिदीच्या बाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पुण्यातही रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

- Advertisement -

अक्षय्य तृतीयेच्या पार्श्वभूमीवर आज मनसेकडून राज्यात ठिकठिकाणी मंदिरांमध्ये महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं. पण अचानक राज ठाकरेंनी काल एक पत्रक जारी करून आजचा महाआरतीचा कार्यक्रम रद्द केल्याचं जाहीर केलं. मात्र, भोंग्याबाबतच्या निर्णयावर राज ठाकरे आपली भूमिका आज जाहीर करणार असल्याचही नमूद केलं आहे. याच पार्श्वभूमीवर सकाळी दहा वाजता मनसेच्या महत्त्वाच्या नेत्यांच्यासोबत राज ठाकरेंची शिवतीर्थवर बैठक आहे. त्यानंतर ते आपली भूमिका जाहीर करणार आहे. परंतु ते कोणती घोषणा करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


हेही वाचा : PM Modi Europe Visit: तीन देशात २५ बैठका आणि ८ जागतिक नेत्यांच्या भेटी, युरोप दौऱ्यामागे पीएम मोदींचा प्लॅन काय?

- Advertisement -

 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -