Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी मुख्यमंत्री पदाच्या लालसेपोटी उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादी-काँग्रेससोबत युती केली, रावसाहेब दानवेंचा हल्लाबोल

मुख्यमंत्री पदाच्या लालसेपोटी उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादी-काँग्रेससोबत युती केली, रावसाहेब दानवेंचा हल्लाबोल

Subscribe

भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री पदाच्या लालसेपोटी उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादी-काँग्रेससोबत युती केली, असा हल्लाबोल रावसाहेब दानवे यांनी उद्ध ठाकरेंवर केला आहे.

रावसाहेब दानवेंनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, शिवसेना आणि भाजपचा विचार एकच आहे. विचारांवर आधारित ही युती होती. २५ वर्ष ही युती राहिली होती. जनतेने युतीला कौल सुद्धा दिला होता. मात्र, शिवसेनेने दगाफटका केला. मुख्यमंत्री पदाच्या लालसेपोटी उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी-काँग्रेससोबत युती केली. ही युती जनतेला मान्य नव्हती आणि या युतीला जनताही कंटाळली होती, असं रावसाहेब दानवे म्हणाले.

- Advertisement -

शिंदे गटाने बंड नाही तर उठाव केला आहे. सेनेतील आमदार-खासदारांनी उठाव केला आहे. सेना आणि भाजप युती हिंदुत्वाच्या विचारांवर चालत होती. शिवसेनेतील फुटीसंदर्भात भाजपचा काहीही संबंध नाही, उलट भाजपाने त्यांना पाठिंबा दिला आणि सेनेचा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला आहे, असं दानवे म्हणाले.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेने दाखल केलेल्या सर्वच याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे शिंदे गटाचे विशेष लक्ष असणार आहे. सरन्यायाधीश रमण्णा यांच्या तीन सदस्यीय खंडपीठासमोर आज सकाळी ११ वाजता सुनावणी होणार आहे.


- Advertisement -

हेही वाचा : रस्त्याचे डांबर पाण्यात विरघळले.., नितेश राणेंची आदित्य ठाकरेंवर टीका


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -