घरमहाराष्ट्ररोहित पवारांनी देवेंद्र फडणवीसांवर केला निधी रोखल्याचा आरोप; "अजित पवार अर्थमंत्री पण..."

रोहित पवारांनी देवेंद्र फडणवीसांवर केला निधी रोखल्याचा आरोप; “अजित पवार अर्थमंत्री पण…”

Subscribe

मुंबई : कर्जत आणि जामखेड मधील दोन शासकीय रुग्णालयाचे काम निधी आभावी ठप्प झाले आहे. पण राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संमतीशिवाय निधी द्याचा नाही, अशा सूचना दिल्या आहे, असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. यामुळे रोहित पवारांनी ट्वीट करत देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून आता देवेंद्र फडणवीस रोहित पवारांच्या आरोपावर काय प्रत्युत्तर देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे.

राष्ट्रवादी काँग्रेससोबत बंड करत अजित पवार हे सत्तेत सामील झाले आहेत. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अजित पवार सहभागी झाल्यानतंर त्यांच्यासह 9 आमदारांना मंत्रीपद मिळले आहे. अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री झाले. यानंतर नुकतेच अजित पवारांकडे हे पुण्याचे पालकमंत्री देखील झाले आहे. अजित पवारांचा सरकारमध्ये दबदबा असून देखील निधी वाटप देवेंद्र फडणवीस यांची सहमती लागते, असे रोहित पवारांना त्यांच्या ट्वीटमध्ये स्पष्टपणे सांगितले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Maratha Reservation : आरक्षण घेऊनच गावात यायचं नाही तर…; जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

- Advertisement -

रोहित पवारांची युवा संघर्ष यात्रा दसऱ्यापासून सुरू होत आहे. या युवा संघर्ष यात्रेतून रोहित पवार राज्य सरकार हल्लाबोल करणार असल्याचे स्पष्ट संकते दिले आहे. या युवा संघर्ष यात्रेत रोहित पवार सरकारवर काय आरोप करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे.

हेही वाचा – कंत्राटी भरतीवरून देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या टीकेवर शरद पवारांचे प्रत्युत्तर; म्हणाले…

रोहित पवारांनी ट्वीटमध्ये काय म्हटले

रोहित पवारांनी ट्वीटमध्ये म्हटले, “माझ्या मतदारसंघातील कर्जत आणि जामखेड या दोन्ही ठिकाणच्या शासकीय रुग्णालयांचं काम अर्धवट होऊन निधीअभावी ठप्प झालंय.. अर्थमंत्री अजितदादा आहेत, मात्र या रुग्णालयासाठी आपल्या संमतीशिवाय निधी द्यायचा नाही, अशा सूचना फडणवीस साहेब आपण दिल्यात. हा आपल्या समकक्ष असलेल्या मा. अजितदादांच्या खात्यावर अंकुश ठेवण्याचा प्रकार असून तो योग्य वाटत नाही… आणि दुसरं म्हणजे उपचाराअभावी एखाद्याचा बळी गेल्यास त्याची जबाबदारी आपण आणि आरोग्यमंत्री घेणार का?

राजकारण तर आपण नेहमीच एकमेकांच्या विरोधात करतोय… पण ते विचारांचं आणि तत्त्वांचं असावं… राजकारणापायी सामान्य माणूस भरडला जाऊ नये, हे आपल्यासारख्या मोठ्या नेत्याला सांगण्याची वेळ यावी, यापेक्षा दुर्दैव ते काय!

हे शेअर केलेले फोटो बघितले तर इतकं काम होऊनही १ रुपयाही निधी दिलेला नाही आणि अशीच अवस्था राज्यातील इतर २६ कामांचीही आहे. मायबाप सरकार हे आपल्याला तरी योग्य वाटतं का?”, असा सवाल रोहित पवारांनी केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -