घरमहाराष्ट्र...तर सरकार ७२ तासांत कोसळलं नसतं, राऊतांचा फडणवीसांवर पलटवार

…तर सरकार ७२ तासांत कोसळलं नसतं, राऊतांचा फडणवीसांवर पलटवार

Subscribe

Sanjay Raut Counter To Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीस अजूनही पहाटेच्या शपथविधीतून बाहेर पडले नाहीत. सहा महिन्यांपूर्वी ४०-५० आमदारांचा जो शपथविधी झाला तोही शरद पवारांच्या सांगण्यानेच झाला असंही ते सांगू शकतील. पहाटेच्या शपथविधीने फडणवीसांना अजूनही दचकून जाग येते, असा चिमटाही त्यांनी काढला.

Sanjay Raut Counter To Devendra Fadnavis | मुंबई – शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासोबत चर्चेनंतर पहाटेचा शपथविधी झाला होता, असा मोठा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी काल एका कार्यक्रमात केला होता. त्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांनी फडणवीसांना पलटवार केला आहे. शरद पवारांच्या सांगण्यानुसार पहाटेचा शपथविधी (Early Morning Swearing) झाला असता तर सरकार ७२ तासांत कोसळलं नसतं, असं संजय राऊत म्हणाले. त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन माध्यमांशी संवाद साधला.

हेही वाचा – शरद पवारांशी चर्चेनंतरच राष्‍ट्रवादी-भाजप सरकार, फडणवीसांचा पुनरुच्चार; पवारांनी फेटाळला दावा

- Advertisement -

देवेंद्र फडणवीस अजूनही पहाटेच्या शपथविधीतून बाहेर पडले नाहीत. सहा महिन्यांपूर्वी ४०-५० आमदारांचा जो शपथविधी झाला तोही शरद पवारांच्या सांगण्यानेच झाला असंही ते सांगू शकतील. पहाटेच्या शपथविधीने फडणवीसांना अजूनही दचकून जाग येते, असा चिमटाही त्यांनी काढला.

अलिकडे मी देवेंद्र फडणवीसांची वक्तव्य पाहतोय. देवेंद्र फडणवीस हे जगातलं दहावं आश्चर्य आहेत. सात आश्चर्य जगात आहेत. दोन आश्चर्य दिल्लीत बसलेत तर दहावं आश्चर्य महाराष्ट्रात आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला. महाराष्ट्रामध्ये सरकाविषयी घृणा आहे. विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा दारूण पराभव झाला. विदर्भात हरले. कसबा, पुण्यातील पोटनिवडणुकीतही त्यांचा पराभव दिसतोय. अजित पवार ठामपणे, मजबुतीने महाविकास आघाडीचे नेते म्हणून महाराष्ट्रात वातावरण तयार करत आहेत आणि भाजपाला आव्हान देत आहेत. त्यामुळे आमच्या प्रतिमांना तडे देण्याकरता अशी कितीही विधाने केली तरीही लोकांचा विश्वास बसणार नाही. मी परत सांगतो पहाटेचा शपथविधीने फडवणसीांना अजूनही जाग येते, यामागचं कारण त्यांनी शोधून काढलं पाहिजे आणि उपचार करून घेतले पाहिजेत, असं संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, सात न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे प्रकरण जाणार का?

अडीच वर्षांचं मुख्यमंत्रीपद देण्याचं आपण मान्य केलं होतं. फडणवीस यांनी हॉटेल ब्लू सीमधील स्वतःचं वक्तव्य पाहावं. अमित शहांसमोर सत्तेचं वाटप पन्नास-पन्नास टक्के हा त्यांचा शब्द होता. त्यांनी विश्वासघात केल्यावर आता इतर कोणी सत्ता बनवताना विश्वासघात केला म्हणून गळा काढण्यात काय अर्थ आहे, असंही राऊत म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -