घरताज्या घडामोडीसूडाच्या राजकारणाचे पायंडे आता तरी थांबतील ही अपेक्षा - खासदार संजय राऊत

सूडाच्या राजकारणाचे पायंडे आता तरी थांबतील ही अपेक्षा – खासदार संजय राऊत

Subscribe

शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे दोघेही राजभवनावर दाखल झाले आहेत. फडणवीस-शिंदेंचा आज संध्याकाळी ७ वाजता शपथविधी सोहळा पार पडणार आहे. सत्तास्थापनेची एवढी घाई कशासाठी?, कोणत्या परिस्थितीत सत्तापरिवर्तन होतंय. हे महाराष्ट्राने पाहिलंय. महाराष्ट्रात एक नवीन राज्य येत आहे. आपल्या सगळ्यांचे मित्र पुन्हा येत आहेत. नवीन मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा द्यायची ही आपली परंपरा आहे. त्यानुसार मी त्यांना शुभेच्छा देतो. हे राज्य खूप मोठं आहे त्यांनाही माहितीये. या राज्यावर संस्कार आहेत. सूडाच्या राजकारणाचे पायंडे आता तरी थांबतील ही अपेक्षा, असं म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपला टोला लगावला आहे.

सूडाच्या राजकारणाचे पायंडे आता तरी थांबतील ही अपेक्षा

संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, या राज्यामध्ये सूडाच्या राजकारणाचे पायंडे गेल्या पाच ते सात वर्षापासून पाडण्यात आले. ते आता थांबतील एवढीच अपेक्षा आहे. जो कालखंड आपल्याला मिळालेला आहे. तो महाराष्ट्राच्या हिताच्या चरणी लावा, राजकारण सत्ताकारण जरा बाजूला ठेवा. पुन्हा एकदा त्यांना मी शुभेच्छा देतो.

- Advertisement -

…म्हणून सत्ता गमावली

भाजपला सत्ता स्थापन करण्यात कसली अडचण? एक मोठा पक्ष त्यांनी फोडला. इतर पक्षात सुद्धा त्यामुळे चलबिचल आणि अस्वस्थता आहे. अशा प्रकारे सत्ता स्थापन करण्याची त्यांची इच्छा पूर्ण झाली. पण राजकारणात या गोष्टी मान्य केल्या पाहिजे, होत असतात. आम्ही त्या करू शकलो नाही म्हणून सत्ता गमावली, असं राऊत म्हणाले.

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होण्याची चर्चा आहे, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, राऊत म्हणाले की,
एक शिवसैनिक मुख्यमंत्री झाला तर पाहू काय होतं ते. पण या क्षणी ते शिवसैनिक नाही, असं मला वाटतं.

- Advertisement -

हेही वाचा : महाविकास आघाडीचा अख्खा वाडा उद्ध्वस्त, राजू शेट्टींची टीका


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -