जब खोने के लिए कुछ भी ना बचा हो तो…, संजय राऊतांचं सूचक ट्विट

त्यांचं हे सूचक ट्विट शिवसेना पक्षाशी संबंधित असून आता हरण्यासाठी काहीच उरलं नाही, असा मतितार्थ यातून काढता येऊ शकतो असं राजकीय विश्लेषक सांगत आहेत.

राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून सत्तांतरानंतरही नियमित राजकीय नाट्य रंगताना दिसत आहे. त्यातच, शिवसेना खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांनी केलेल्या आजच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. त्यांचं हे सूचक ट्विट शिवसेना पक्षाच्या चिन्हाशी संबंधित असून आता हरण्यासाठी काहीच उरलं नाही, असा मतितार्थ यातून काढता येऊ शकतो असं राजकीय विश्लेषक सांगत आहेत. (Sanjay Raut tweet on state political situation)

हेही वाचा – सन्मानाने बोलवायचे म्हणजे नक्की कसे? संजय राऊतांचा बंडखोर आमदारांना सवाल

“जब ‘खोने’के लिए कुछ भी ना बचा हो तो “पाने” के लिए बहुत कुछ होता हैं!. जय महाराष्ट्र !”, असं त्यांनी ट्विट केलं आहे. यावरून त्यांच्याकडे आता गमावण्यासाठी काहीच उरलं नसून जिंकण्यासाठी बऱ्याच गोष्टी आहेत, असा यातून अर्थ काढता येऊ शकेल, असं राजकीय विश्लेषक सांगत आहेत.


दरम्यान, २१ जूनपासून राज्यात सत्तांतराचे नाट्य सुरू झाले. एकनाथ शिंदेंसह शिवसेनेतील ३९ आमदारांनी बंड पुकारले होते. शिवसेनेसोबत फारकत घेऊन त्यांनी सेनेतच दुसरा गट स्थापन केला. याच काळात २२ जूनला महाराष्ट्र राजकीय घडामोडींचा प्रवास विधानसभा बरखास्तीच्या दिशेने असं ट्विट करून संजय राऊतांनी खळबळ उडवून दिली होती. राज्यात आता लवकरच मध्यावधी निवडणुका होणार असल्याची पहिली ग्वाही संजय राऊतांनी त्यांच्या ट्विटमधून दिली. मात्र, शरद पवार मैदानात आल्यानंतर संजय राऊतांनी आपली भूमिका बदलली. सध्या राज्यात सत्तांतर घडून आले असले तरीही लवकरच मध्यावधी निवडणुका लागू शकतात असा दावा उद्धव ठाकरेंसह शरद पवारांनीही केला आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी आज केलेल्या ट्विटनुसार शिवसेनेत आता हरण्यासाठी काहीच उरलं नाही का असा प्रश्न पडला आहे. दरम्यान, शिवसेनेच्या धनुष्यबाणावरूनही सध्या जोरदार खडाजंगी सुरू आहे.

हेही वाचा – शिवसेनेत उठाव करणं गरजेचं होतं, आमदार सदा सरवणकरांची खंत

संजय राऊत यांनी केलेल्या ट्विटनुसारच राज्यात सत्तांतर घडून आले. त्यामुळे राऊतांनी आज केलेल्या ट्विटचा अर्थ नक्की काय घ्यायचा याबाबत प्रश्न उभे राहिले आहे.

मी नव्याने सुरुवात करतोय. माझा सर्वसामान्य शिवसैनिक हेच माझे बळ आहे. हीच माझी दौलत आहे. मी १९ जून १९६६ च्या मानसिकतेचा आहे, तुम्ही तयार आहात का? तेव्हा धनुष्यबाण देखील नव्हतं, त्या मानसिकतेतून आपल्याला लढायचं आहे, असं उद्धव ठाकरे ६ जुलैच्या भाषणात म्हणाले होते. त्यामुळे शिवसनेच्या हातातून धनुष्यबाणही जाणार अशी शक्यता खुद्द पक्षप्रमुख यांना वाटते.

हेही वाचा – मी धनुष्यबाण नव्हतं त्या मानसिकतेत -उद्धव ठाकरे