घरमहाराष्ट्रशशिकांतचा खुनी कोणाबरोबर? राऊतांनी ट्विटरवर शेअर केला 'या' नेत्याचा फोटो

शशिकांतचा खुनी कोणाबरोबर? राऊतांनी ट्विटरवर शेअर केला ‘या’ नेत्याचा फोटो

Subscribe

रत्नागिरीतील पत्रकार शशिकांत वारीसे यांच्या हत्या प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण पेटलं आहेय. विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरत शिंदे फडणवीस सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. यात शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी आज शशिकांत वारीसे यांच्या कुटुंबियांची भेट घेत त्यांच सांत्वन केल. यासह रिफायनरीविरोधातील संघटनांनी आज शशिकांत वारीसे यांच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्याच्या मागणीसाठी राजापूर तहसील कार्यालयावर मोर्चा काढला आहे. या मोर्चा खासदार विनायक राऊत देखील सहभागी झाले आहेत. तर दुसरीकडे खासदार संजय राऊत यांनी या हत्येप्रकरणाची गांभीर्याने दखल चौकशीच्या मागणीसाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. याचप्रकरणी राऊतांनी आता एक ट्विट केलं आहे. व्यक्ती को कुचल देनेसे विचार नही मरता म्हणत शशिकांतचा खुनी पंढरीनाथ आंबेरकर कोणाबरोबर? असा सवाल राऊतांनी या ट्विटमधून उपस्थित केला आहे. तसेच नाणार परिसरात नेत्यांनी मोठ्या प्रमाणात बेनामी जमीन खरेदी केल्या. त्या सर्व सावकार आणि जमीनदारांनी मिळून शशिकांत यांचा काटा काढण्यासाठी सुपारी दिली, असा गंभीर आरोपही राऊतांनी केला आहे. यासोबत त्यांनी शिंदे गटातील नेते आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचा फोटो शेअर केला आहे.

संजय राऊतांचं नेमकं ट्विट काय?

व्यक्ती को कुचल देनेसे विचार नही मरता. पत्रकार शशिकांत वारीसे यांचा खून राजकीय आहे. नाणार परिसरात नेत्यांनी बेनामी जमीन खरेदी मोठ्या प्रमाणात केली आहे. त्या सर्व सावकार आणि जमीनदारांनी मिळून शशिकांत यांचा काटा काढण्यासाठी सुपारी दिली. शशिकांत चा खुनी पंढरीनाथ आंबेरकर कोणाबरोबर? असा सवाल राऊतांनी या ट्विटमधून उपस्थित केला आहे.

- Advertisement -

दरम्यान पत्रकार शशिकांत वारीसे यांच्या मृत्यूनंतर आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत.  दरम्यान यात ठाकरे गटाने या हत्येसाठी सत्ताधारी पक्षाला जबाबदार धरले आहे, दरम्यान या हत्याकांडावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आवाज उठवल्याने त्यांना जीवे मारण्याच्या धमकीचे फोन येत असल्य़ाची खळबळजनक माहिती त्यांनी दिली आहे. तुमचाही शशिकांत वारिसे करू, अशा धमक्या संजय राऊत यांना आल्या आहेत. दुसरीकडे राऊत यांनी वारिसे यांची हत्या आर्थिक घोटाळ्यातूनच झाल्याचा आरोप केला आहे. पत्रकार परिषद घेऊन राऊत यांनी हा आरोप केला आहे.


महाराष्ट्रात हे काय सुरू आहे? पत्रकार वारीसेंच्या मृत्यू प्रकरणी राऊतांचा फडणवीसांना सवाल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -