घरताज्या घडामोडीशिवसेनेच्या प्रतोदपदावरून भावना गवळींची उचलबांगडी, ठाण्याच्या खासदाराची नियुक्ती

शिवसेनेच्या प्रतोदपदावरून भावना गवळींची उचलबांगडी, ठाण्याच्या खासदाराची नियुक्ती

Subscribe

संदर्भात शिवसेना खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांनी संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी (Pralhad Joshi) यांना पत्र लिहिले आहे.

लोकसभेतील शिवसेनेच्या प्रतोद पदावरुन भावना गवळी (Bhavan Gawali) यांची उचलबांगडी करण्यात आली असून त्याजागी खासदार राजन विचारे (Rajan Vichare) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भात शिवसेना खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांनी संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी (Pralhad Joshi) यांना पत्र लिहिले आहे. (Shivsena Sacked Mp Bhavana Gawali From Chief Whip In Loksabha Rajan Vicahre Is New Whip)

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर भावना गवळी यांनी पत्र लिहून शिंदेंना पाठिंबा दर्शवला होता. त्यामुळे भावना गवळींसह १२ खासदार फुटण्याची शक्यता आहे. म्हणूनच, शिवसेनेने भावना गवळी यांना प्रतोदपदावरून हटवले आहे, असं सांगण्यात येत आहे.

- Advertisement -

हेही वाचा मनी लॉन्ड्रिंग प्रकरण: भावना गवळींचे सहकारी सईद खान यांना जामीन मंजूर

प्रल्हाद जोशी यांना लिहिलेल्या पत्रात संजय राऊत म्हणाले की, लोकसभेतील शिवसेनेच्या प्रतोदपदी असलेल्या भावना गवळी यांच्या जागी आम्ही खासदार राजन विचारे यांची तातडीने नियुक्ती करत आहोत.

- Advertisement -

bhavana gawali

शिवसेनेने केलेल्या या कारवाईने भावना गवळी काय निर्णय घेतात हे पाहावं लागणार आहे. दरम्यान, भावना गवळी यांच्यावरही सध्या ईडीची चौकशी लागली आहे. त्यांचा सहकारी सईद खान हा नुकताच ईडीच्या कोठडीतून जामीनार सुटला आहे. त्यामुळे येत्या काळात भावना गवळीही ईडीच्या रडारवर अडकण्याची शक्यता आहे. त्यातच, एकनाथ शिंदे यांनी पुकारलेले बंड योग्य असल्याचं भावना गवळी यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून सांगितले होते. त्यामुळे शिवसेनेच्या या कारवाईमुळे त्याही शिवसेना सोडून भाजपमध्ये जाणार का हे पाहावं लागेल.

हेही वाचा – Bhavana Gawali : भावना गवळींना पुन्हा ईडीचे समन्स, चौकशीला न आल्यास ED कारवाई करणार

दरम्यान, शिवसेनेचे खासदार राहूल शेवाळे यांनीही काल उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची मागणी केली होती. द्रौपदी मुर्मू या भाजपच्या उमेदवार आहेत. त्यामुळे येत्या काळात राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी खासदारही फुटण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत फूट पडली तर एकनाथ शिंदे गटाला बळकटी मिळणार आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -