घरताज्या घडामोडीNitesh Rane : नितेश राणेंना धक्का, जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला

Nitesh Rane : नितेश राणेंना धक्का, जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला

Subscribe

हायकोर्टाकडूनही जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यालयात धाव घेतली होती. परंतु त्यांचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला असून १० दिवसांत जिल्हा सत्र न्यायालयात शरण जाण्याचे निर्देश दिले होते.

भाजप आमदार नितेश राणे यांचा जामीन अर्ज सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीदरम्यान शिवसैनिक संतोष परब यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात नितेश राणे यांचाही सहभाग असल्याचा आरोप करण्यात येत आहे. यापूर्वी नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता परंतु तो फेटाळण्यात आला होता. यानंतर नितेश राणेंनी हायकोर्टात धाव घेतली होती. हायकोर्टाकडूनही जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यालयात धाव घेतली होती. परंतु त्यांचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला असून १० दिवसांत जिल्हा सत्र न्यायालयात शरण जाण्याचे निर्देश दिले होते. जिल्हा सत्र न्यायालयात नितेश राणेंनी रीतसर जामीन अर्ज दाखल केला होता त्यावर सुनावणीदरम्यान न्यालयाने जामीन अर्ज फेटाळला आहे.

नितेश राणेंचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. आम्हाला हे अपेक्षित होते त्यामुळे आम्ही लगेच हायकोर्टात धाव घेतली आहे. पुढील २ ते ३ दिवसांत हायकोर्टात सुनावणी होईल असे नितेश राणेंच्या वकिलांनी सांगितले आहे. नितेश राणेंना १० दिवस अटकेपासून संरक्षण असल्यामुळे पोलिसांकडून अटक करण्यात येणार नाही.

- Advertisement -

निलेश राणे- पोलिसांमध्ये बाचाबाची

आमदार नितेश राणे यांचा जामीन अर्ज सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. नितेश राणे कोर्टातून बाहेर पडल्यानंतर गाडीत जाऊन बसले. भाजप नेते निलेश राणे यांची गाडी पोलिसांनी अडवली. यानंतर पोलीस आणि निलेश राणे यांच्यात बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले. माझी गाडी कोणत्या अधिकाराखाली थांबवण्यात आली असा सवाल निलेश राणे यांनी पोलिसांना केला. यावेळी कार्यकर्त्यांनी नितेश राणेंच्या गाडीला घेराव घातला होता. नितेश राणे ज्या गा़डीत बसले होते त्याच गाडीसमोर पोलीस आणि निलेश राणे यांच्यात बाचाबाची झाली. दरम्यान थोडा वेळानंतर नितेश राणे स्वतः गाडीतून पायउतार झाले आणि बाहेर आले. नितेश राणेंच्या वकिलांनी पोलिसांसोबत चर्चा केल्यावर नितेश राणेंना सोडण्यात आले. यादरम्यान न्यायालयासमोर हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला.

नितेश राणेंचा जामीन मेंटेनेबल नसल्याने फेटाळला – अॅड घरत

सरकारी वकील प्रदिप घरत म्हणाले की, नितेश राणेंचा जामीन अर्ज मेंटेनेबल नाही म्हणून फेटाळण्यात आला आहे. कारण जी सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आहे त्याप्रमाणने त्यांनी न्यायालयासमोर प्रथम शरण आले पाहिजे. यानंतर जमीन अर्ज केला पाहिजे परंतु त्यांनी न्यायालयासमोर शरण न येताच जामीन अर्ज केला होता. त्यामुळे या कोर्टासमोर तो अर्ज मेंटेनेबल नाही.

- Advertisement -

आमच्या म्हणण्याप्रमाणे या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. त्यांनी शरण न येताच जामीन अर्ज केला ही पहिली गोष्ट आणि आरोपी न्यायालयासमोर बसायला लागले. मी न्यायालयासमोर शरण आलोय असे लेखी देतो असेही म्हटले होते. अशा प्रकारे आरोपी जे म्हणत होते त्यावर युक्तिवाद झाला तसेच त्याच्यावर न्यायालयीन दाखले देण्यात आले. त्या प्रमाणे शरणागती स्वीकारावी लागेल एकदा शणागती स्वीकारली की न्यायालयाच्या आदेशाशिवाय काहीही करता येणार नाही असा युक्तिवाद करण्यात आला असल्याचे वकील प्रदीप घरत यांनी सांगितले आहे. परंतु न्यायालयात शरण न आल्यामुळे नितेश राणेंचा जामीन फेटाळला असल्याचे वकील प्रदीप घरत म्हणाले.


हेही वाचा : Students Agitation: ‘हिंदुस्तानी भाऊ’ला तीन दिवसांची पोलीस कोठडी

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -