घरताज्या घडामोडीआचारसंहितेतही होणार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची पूजा, जाणून घ्या रुपरेषा

आचारसंहितेतही होणार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची पूजा, जाणून घ्या रुपरेषा

Subscribe

पूजा करणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. दरम्यान, याचवेळी शिंदेगटाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. मात्र, आचारसंहितेमुळे हा मेळावा रद्द करण्यात आला आहे.

दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजा केली जाते. मात्र, यंदा राज्यात नगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्याने सोलापुरात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. त्यामुळे नव्याने मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले एकनाथ शिंदे यंदा पूजा करणार की नाही याबाबत शंका उपस्थित केली जात होती. मात्र,  निवडणूक आयोगाने परवानगी दिल्याने ते पूजा करणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. दरम्यान, आचारसंहितेमुळे याचवेळी आयोजित करण्यात आलेला शिंदेगटाचा मेळावा रद्द करण्यात आला आहे. (The Chief Minister Eknath shinde will worship Vitthal in the Code of Conduct)

हेही वाचा – एकनाथ शिंदे भाजपचे मुख्यमंत्री, विचारांचं आदान-प्रदान मध्यरात्री करतात; संजय राऊतांचा घणाघात

- Advertisement -

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर दोन वर्ष वारी झाली नव्हती. त्यामुळे यंदा वारकऱ्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. पंढरपुरात काही पालख्या दाखल झाल्या असून यंदा विश्वविक्रमी गर्दी होणार असल्याचं म्हटलं जातंय. दरम्यान, यावर्षी विठ्ठलाची पूजा कोणाच्या हातून होणार असा प्रश्न निर्माण झाला होता. २१ जूननंतर राज्यात सत्तानाट्य सुरू झाल्याने उद्धव ठाकरे पूजा करतील की देवेंद्र फडणवीस असा प्रश्न पडला होता. मात्र, ऐनवेळेला सत्ता समीकरण बदलले आणि एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे परंपरेनुसार एकनाथ शिंदे सपत्नीक सकाळी साडेचार वाजता विठ्ठलाची पूजा करतील.

राज्यात १७ जिल्ह्यांमध्ये ९२ नगर परिषदांच्या आणि चार नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. शुक्रवारी निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यामुळे २० जुलैपासून निवडणूक प्रक्रिया सुरू होणार असून निवडणूक लागलेल्या जिल्ह्यांमध्ये आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. त्यामुळे आचारसंहितेमुळे एकनाथ शिंदे विठ्ठलाची पूजा करणार की नाही याबाबत शंका निर्माण झाली होती. मात्र, ते पूजा करणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

- Advertisement -

हेही वाचा शिवसेना आता कदापी उभी राहणार नाही, नारायण राणेंची बोचरी टीका

एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यांनी काल गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. त्यानंतर आज सायंकाळी चार वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर ते थेट पुण्यात येण्यासाठी रवाना होणार आहेत. आज ते पुण्यामार्गे पंढपुरात दाखल होतील.

एकनाथ शिंदे यांचा आजचा दौरा कसा असेल?

एकनाथ शिंदे यांनी आज सकाळपासून राष्ट्रपती रामनाथ कोविंद, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली आहे. आता सायंकाळी ४.३० वाजता ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यादरम्यान, त्यांची पत्रकार परिषदही होणार आहे. त्यानंतर, सायंकाळी ६ वाजता ते एअरपोर्टवर दाखल होणार आहेत.

उद्याची रुपरेषा कशी असेल?

  • आज रात्री ते दिल्लीहून पुण्यात दाखल होतील. त्यानंतर चारचाकीने ते पंढरपूरकडे प्रयाण करतील. रात्री ११.३० पर्यंत पंढरपुरात पोहोचल्यावर शासकीय विश्रामगृह पंढरपूर येथे आयोजित ‘पर्यावरणाची वारी, पंढरीच्या दारी’ कार्यक्रमाच्या समारोपास उपस्थिती.
  • रविवार १० जुलै रोजी मध्यरात्री २.३० ते पहाटे ४.३० श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात शासकीय महापूजेसाठी सपत्नीक उपस्थित राहणार.
  • पहाटे ५.३० वा. विठ्ठल मंदिर परिसरातील इस्कॅान आंतरराष्ट्रीय मंदिराचे भूमिपूजन. पहाटे ५.४५ वा. नदी घाटाच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती.
  • सकाळी ११.१५ वा. शासकीय विश्रामगृह येथे सोलापूर जिल्हयातील सुंदर माझे कार्यालय या स्पर्धेच्या पारितोषिक वितरणास उपस्थिती.
  • सकाळी ११.४५  वा. पंचायत समिती पंढरपूर येथे ‘स्वच्छता दिंडी’ समारोपास उपस्थिती. दु. १२.३० वा. पक्ष मेळाव्यास उपस्थिती.
  • दुपारी ३ वा. मोटारीने सोलापूर विमानतळाकडे प्रयाण व तेथून शासकीय विमानाने मुंबईकडे प्रयाण. सायं. ४.३० वा. मुंबई विमानतळ येथे आगमन व ठाण्याकडे प्रयाण.
Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -