घरदेश-विदेशविरोधी पक्ष हा केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून अराजक निर्माण करतोय, संजय राऊतांचा...

विरोधी पक्ष हा केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून अराजक निर्माण करतोय, संजय राऊतांचा घणाघात

Subscribe

नागपुरातल्या धाडींविषयी मी माहिती पाहिली. मला नागपुरातून काही पत्रकारांनी फोन केले. काही वकिलांनी फोन केले. भविष्यात नाना पटोलेंवर धाडी पडल्या तरी मला आश्चर्य वाटणार नाही. कारण ते सतीश उके हे नाना पटोलेंचे वकील आहेत.

मुंबईः महाराष्ट्रातला विरोधी पक्ष हा केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून झुंडशाही आणि अराजक निर्माण करू इच्छितो. केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर हा पाळलेल्या गुंडांसारखा कोणी करत असेल तर ते संघराज्य व्यवस्थेला अत्यंत धोकादायक असल्याचं म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी भाजपवर हल्लाबोल केलाय. संजय राऊतांनी आज दिल्लीत पत्रकारांशी बातचीत केलीय, त्यावेळी ते बोलत होते.

नागपुरातल्या धाडींविषयी मी माहिती पाहिली. मला नागपुरातून काही पत्रकारांनी फोन केले. काही वकिलांनी फोन केले. भविष्यात नाना पटोलेंवर धाडी पडल्या तरी मला आश्चर्य वाटणार नाही. कारण ते सतीश उके हे नाना पटोलेंचे वकील आहेत. या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रात घडत राहतील, आमच्या विरोधी पक्षातले नेते सांगतील, कर नाही त्याला डर कशाला, सर्वकाही कायद्याने होत आहे. जर कर नाही त्याला डर कशाला, मग तुम्ही केलेल्या कृत्यांचे आम्ही तुमच्या यंत्रणांना जे पुरावे दिलेत, त्यावर त्या कारवाई का करत नाहीत, असा सवालही संजय राऊतांनी उपस्थित केलाय.

- Advertisement -

न्यायाचा तराजू ज्याला मी म्हटलं होतं, चोरबाजारातला तराजू आहे. सत्याचा आणि न्यायाचा हा जो तराजू आहे तो चोर बाजारातला आहे, असं मी म्हटल्यावर त्यावर टीका झाली. तसेच हा सर्वोच्च न्यायालय आणि न्यायालयाचा अपमान असल्याचं सांगण्यात आलं. शेवटी तराजू हा सरळ पाहिजे, तो नाही आहे. जर कोणी काही गुन्हे, अपराध केलेले असतील तर त्यांच्यावर कारवाई व्हावी. कायदा सगळ्यांसाठी समान आहे, पण महाराष्ट्राच्या बाबतीत किंवा जिथे भाजपचे मुख्यमंत्री नाहीत, त्यांच्या बाबतीत हा तराजू एका बाजूला कललेला आणि झुकलेला दिसतो, असंही संजय राऊतांनी अधोरेखित केलंय.

ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले जातायत, त्यांच्यावर कारवाई होत नाही. जे माहिती देतायत, व्हिसलब्लोअर आहेत, त्यांच्यावर महाराष्ट्रात सातत्याने कारवाई सुरू आहे. आता चिंता करावी असा विषय राहिलेला नाही. गंमत पाहावी आणि गंमत करावी असे विषय झालेले आहेत. आम्हीसुद्धा अनेक विषयांसंदर्भात व्यवस्थित माहिती जिकडे द्यायची आहे, तिकडे दिलेली आहे. आम्ही दिलेल्या एकाही पुराव्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांनी, प्रधानमंत्री कार्यालयाने अद्याप कारवाई केलेली नाही, असंही ते म्हणालेत.

- Advertisement -

यूपीएचे अध्यक्ष आणि काँग्रसचे अध्यक्ष हे दोन वेगळे विषय

काँग्रेस पक्षाचं नेतृत्व कुणी करावं हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. यूपीएचे अध्यक्ष आणि काँग्रसचे अध्यक्ष हे दोन वेगळे विषय आहेत. काँग्रेस पक्षानं यूपीएसाठी प्रयत्न करावे. तसेच यूपीए कुणाची खासगी जहागीर नाही, असंही संजय राऊत म्हणालेत. यूपीएचं नेतृत्व करायचे असेल तर त्यासाठी काँग्रेसनं पुढाकार घ्यायला हवा. पण काँग्रेस याबाबत पुढाकार घ्यायला तयार नाही. 2024 ची तयारी करायची असेल तर यूपीए मजबूत करावीच लागेल. त्यासाठी यूपीएच्या सातबाऱ्यावर अनेक नावे टाकावीच लागतील. सध्या यूपीए संदर्भात काँग्रेसकडून कोणत्याही प्रकारची हालचाल दिसत नाही, हे दुर्दैवी आहे. काँग्रेसनं यूपीएच्या जीर्णोद्धाराची तयारी करायला हवी. एनडीए पूर्णपणे संपला आहे. एनडीए सध्या अस्तित्वात नाही. एनडीएतून बाहेर पडलेल्यांनी एकत्र बसावे, चर्चा करावी, असा विषय समोर येत असल्याचंही त्यांनी नमूद केलंय.


हेही वाचाः Petrol-Diesel Price: पेट्रोल, डिझेलचे वाढते दर सर्वसामान्यांसाठी ठरतायत डोकेदुखी

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -