घरमहाराष्ट्र...तर आज ही वेळ आली नसती, मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला

…तर आज ही वेळ आली नसती, मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला

Subscribe

स्थानिक निवडणुकांसाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेनेसोबत युती करण्यासंदर्भातील जो प्रस्ताव दिला आहे, तो योग्य नसल्याचेही एकनाथ शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले

ठाणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणत आहेत. त्यासाठीच त्यांनी द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपतीपदाची उमेदवारी दिली आहे. उद्धव ठाकरे यांनी मूर्मू यांना पाठिंबा दर्शवला आहे. आम्हीदेखील त्यांना आधीच पाठिंबा दिलेला आहे. अडीच वर्षांपूर्वी हीच भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतली असती, तर आज ही वेळ आली नसती, असा टोला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.

एकनाथ शिंदे यांनी बुधवारी गुरुपौर्णिमेनिमित्त शिवाजी पार्क येथील शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाचे दर्शन घेतले. त्यानंतर ठाण्यातील टेंभी नाक्यावरील आनंदाश्रमामध्ये येऊन दिवंगत आनंद दिघे यांनाही आदरांजली वाहिली. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांची शिकवण आचरणात आणून आम्ही काम करीत आहोत. जेणेकरून सामान्य नागरिकांच्या जीवनात बदल घडून येईल. राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच स्थानिक निवडणुकांसाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेनेसोबत युती करण्यासंदर्भातील जो प्रस्ताव दिला आहे, तो योग्य नसल्याचेही एकनाथ शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले.

- Advertisement -

उल्हासनगरचे 18 नगरसेवक शिंदे गटात

बुधवारी आनंद आश्रम येथे उल्हासनगरचे सुमारे १८ नगरसेवक, नाशिक, दिंडोरी आणि नगर येथील शिवसेना नगरसेवक शिंदे गटात सहभागी झाले. गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेतेली अनेक निष्ठावान कार्यकर्ते, नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना समर्थन दिले आहे. त्यातच, उल्हासनगरमधील १७ नगरसेवक शिंदे गटात सामील झाले तर, नाशिकमधीलही अनेक नगरसेवकांनी शिंदे गटाला समर्थन दिले आहे. त्यामुळे उल्हासनगरचे १७ आणि नाशिकचे अनेक नगरसेवक पदाधिकारी आम्हाला पाठिंबा देतायेत, असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.

- Advertisement -

हेही वाचाः दीपक केसरकर लायकीपेक्षा जास्त बोलू नका, नाही तर…; राणेंच्या धमकीनंतर युतीत पडणार वादाची ठिणगी

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -