घरमहाराष्ट्रAaditya Thackeray : ...त्यांनी निर्लज्जपणा थोडा बाजूला ठेवावा; दावोस दौऱ्याबाबत मुख्यमंत्र्यांना ठाकरेंचे...

Aaditya Thackeray : …त्यांनी निर्लज्जपणा थोडा बाजूला ठेवावा; दावोस दौऱ्याबाबत मुख्यमंत्र्यांना ठाकरेंचे प्रत्युत्तर

Subscribe

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तीन दिवसांच्या दावोस दौऱ्यावर परतले आहेत. दावोसमध्ये जागतिक आर्थिक परिषदेत मुख्यमंत्र्यांनी 3 लाख 53 हजार कोटींचे सामंज्य करार केले आहेत, तर दीड लाखांपेक्षा जास्त एमओयूला स्वीकृती मिळाल्याची त्यांनी माहिती दिली. मात्र या दौऱ्यावर खर्च किती झाला याचा हिशोब ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मागितली होता. मात्र एकनाथ शिंदे यांनी टीका केली होती. याचपार्श्वभूमीवर आता आदित्य ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. (They should lay aside their impudence a little Aditya Thackeray reply to Chief Minister Eknath Shinde regarding Davos visit)

हेही वाचा – Maratha Reservation : मुंबईपर्यंतच्या प्रवासात मनोज जरांगेची ‘व्हॅनिटी व्हॅन’ वेधणार लक्ष

- Advertisement -

दावोस दौऱ्यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, सगळ्या कंपन्या दावोसला येतात, पण तिथे कोणी नुसतं करार करण्यासाठी येत नाही. अनेक कंपन्या वेगळ्या वेगळ्या देशांच्या भेटीगाठीसाठी येत असतात. त्याठिकाणी वेगळ्या वेगळ्या प्लॅटफॉर्मवर चर्चा होते. त्या चर्चेत तुम्ही सहभागी झाले पाहिजे. जसं काँग्रेस केंद्र त्याठिकाणची मुख्य जागा आहे. त्याठिकाणी जाऊन जर घटनाबाह्य मुख्यमंत्री काही बोललेच नसतील, तर जाण्यात काय अर्थ होता? असा प्रश्न उपस्थित करत गुवाहाटीला किंवा अहमदाबादला जाऊ शकले असते. करार तर तुम्ही तिथेही जाऊन करू शकला असता, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

एकनाथ शिंदेंवर टीका करताना आदित्य ठाकरे म्हणाले की, दौऱ्याचा हिशोब मागणारे बाहेर ज्या पद्धतीची टीका करत आहेत, मला वाटतं त्यांनी निर्लज्जपणा थोडा बाजूला ठेवावा आणि जे काही उत्तर त्यांनी महाराष्ट्राला देणं गरजेचं आहे ते द्यावे. कारण हा पैसा जनतेचा आहे. पन्नास खोके त्यांनी ज्यांना-ज्यांना दिलेले आहेत, कदाचित त्यांनी ते कुठून काढले हे मला माहित नाही, पण पुन्हा एकदा मी सांगतो की, जसं आम्ही जनतेची अदालत घेतली होती. याचपार्श्वभूमीवर मी मुख्यमंत्र्यांना आव्हान करतो की, त्यांनी उद्योग खात्यावर चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत एकटं बसावं किंवा पूर्ण खात्यासोबत बसावं आणि मी एकटं असेन, मग माध्यमांसमोर एकदा काय ते होऊन जाऊदे.

- Advertisement -

हेही वाचा – Aaditya Thackeray : …त्यांनी निर्लज्जपणा थोडा बाजूला ठेवावा; दावोस दौऱ्याबाबत मुख्यमंत्र्यांना ठाकरेंचे प्रत्युत्तर

फॉक्सकोन, एअरबस टाटा, वैद्यकीय उपकरण पार्क, विश्वचषकाचा अंतिम सामना आणि आता जे करार झाले आहेत, त्यावर आपण चर्चा करूया. मागच्या वर्षीचा दावोस दौरा हा गंमत दौरा होता. त्यांना जर वाटत असेल की आम्ही सत्तेच्या बाहेर तडफडत आहे, तर होय आम्ही महाराष्ट्रासाठी तडफडत आहोत. त्यामुळे मी पुन्हा मुख्यमंत्र्यांना आव्हान करेल की, त्यांनी माझ्यासोबत एका मंचावर यावं आणि समोर बसावं, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -